ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट स्टारर चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार - Bobby Deol as a villain - BOBBY DEOL AS A VILLAIN

Bobby Deol as a villain : बॉबी देओल आता 'अ‍ॅनिमल'नंतर आलिया भट्ट स्टारर चित्रपटामध्ये खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करत आहे.

Bobby Deol
बॉबी देओल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 3:12 PM IST

मुंबई - Bobby Deol as a villain : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता बॉबी देओल हा 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झोतात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. आता बॉबी देओलला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर तो आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर स्पाय चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यशराज बॅनरनं बॉबीला स्पाय ड्रामामध्ये साईन केलं आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉबी देओल दिसणार खलनायकाच्या भूमिकेत : बॉबी खलनायक बनून त्यांच्या मिशनमध्ये अडथळा आणताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव रवैल करणार आहे. सध्या चित्रपटाचं पेपरवर्क पूर्ण झालं असून बॉबी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं शूटिंग जून 2024 मध्ये होणार आहे. आलिया आणि शर्वरीच्या चित्रपटात बॉबी देओलचा 'अ‍ॅनिमल'मधील स्वॅग आणि स्टाइल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये बॉबी देओलचा जबरदस्त लूक पाहिला मिळाला होता. आलियाचे चाहते या चित्रपटाच्या शीर्षकाची आणि रिलीजच्या तारखेची वाट पाहत आहेत.

बॉबी देओल वर्कफ्रंट : बॉबीचा हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्समधील आठवा चित्रपट असेल. याआधी 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर','पठाण', 'टायगर 3', 'वॉर 2' आणि 'टायगर व्हर्सेस पठाण' चित्रपटांचा समावेश त्याच्या यादीत आहे. आलिया भट्टच्या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. पहिल्यांदा या चित्रपटामध्ये आलिया ॲक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान बॉबी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'कांगुवा' या चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार सूर्याबरोबर दिसणार आहे. तसंच तो 'हरि हारा वीरा मल्लू' चित्रपटात पवन कल्याणबरोबर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो एनबीके (NBK 109) या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतनं केलं शाहरुख खानवर वक्तव्य - kangana ranaut
  2. चित्रपटाची भव्यता ओटीटीमध्येदेखील अनुभवता येणार, संजय लीला भन्साळींची वेब सिरीज 'या' तारखेला होणार रिलीज - hiramandi the diamond bazaar
  3. श्रेयस तळपदे, विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर - Kartam Bhugtam

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.