ETV Bharat / entertainment

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन जूनमध्ये सुरू, घोषणेचा प्रोमो व्हायरल - BIGG BOSS OTT 3 - BIGG BOSS OTT 3

Bigg Boss OTT Season 3 : 'बिग बॉस ओटीटी 3' प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. याबरोबर एक घोषणा देखील करण्यात आली आहे.

Bigg Boss OTT Season 3
बिग बॉस ओटीटी सीझन 3 ((jiocinema - instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 2:55 PM IST

मुंबई - Bigg Boss OTT Season 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नवीन सीझन 3ची वाट अनेकजण पाहात आहेत. अखेर 'बिग बॉस ओटीटी 3' संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. या शोचा पहिला प्रोमो आता सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हा प्रोमो अनेकांना आवडत असून यावर अनेकजण प्रतिक्रिया देऊन सलमान खानबद्दल विचारत आहेत. कारण तिसऱ्या सीझनमध्ये 'भाईजान' चाहत्यांना दिसणार नाही. याऐवजी अनिल कपूर हा शो होस्ट करताना दिसेल, असं सध्या म्हटलं जात आहे. 'बिग बॉस ओटीटी' शो 2021 मध्ये पहिल्यांदाच सुरू झाला. पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती. यानंतर यूट्यूबर एल्विश यादवनं रिॲलिटी शोचा दुसरा सीझन जिंकला.

'बिग बॉस ओटीटी 3'चा प्रोमो रिलीज : पहिल्या सीझनमध्ये करण जोहरनं शो होस्ट केला होता. दुसरा सीझन हा सलमान खाननं होस्ट केला होता. 'बिग बॉस ओटीटी 3' जूनमध्ये जीओ सिनेमावर लॉन्च होईल. यानंतर 22 जूनला 'बिग बॉस ओटीटी 3' च्या आगामी सीझनची घोषणा केली जाणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस'मधील शेवटच्या सीझनच्या काही खास क्षणांची झलक शेअर दाखविल्या आहेत. याशिवाय एक घोषणाही करण्यात आली आहे. या प्रोमोत असं म्हटलं गेलं आहे की, "बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन पाहिल्यानंतर तुम्ही सर्व काही विसरून जाल." दरम्यान 'बिग बॉस ओटीटी 3'च्या स्पर्धकांबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

'बिग बॉस ओटीटी 3' कुठे पहायचे : बिग बॉसचे प्रत्येक सीझन कलर्स वाहिनीवर प्रसारित झाले आहेत. आता जिओ सिनेमावर या शोचे दोन्ही सीझन विनामूल्य दाखवले गेले होते. यावेळी तुम्हाला 'बिग बॉस ओटीटी 3' पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. जीओ सिनेमावर एका महिन्याचे सबस्क्रिप्शन 29 रुपये आहे, त्यानंतर तुम्ही हा शो जीओ सिनेमावर पाहू शकता. आता 'बिग बॉस ओटीटी 3'ची चर्चा होत आहे. काहीजण सलमान खाननं हा शो होस्ट केला पाहिजे असं म्हणत आहेत. अनेकजण हा शो सलमानसाठी पाहात असल्याचं कमेंट्स करून सांगत आहेत.

हेही वाचा :

  1. 'हीरामंडी'मधील 'गजगामिनी वॉक'ची जान्हवी कपूर आणि राजकुमार राव उडवली खिल्ली - Janhvi Kapoor And Rajkummar Rao
  2. 'पुष्पा 2 द रुल' अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सुसेकी' गाण्याची झलक रिलीज - Pushpa 2
  3. 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह इन व्हिएतनाम'चा फर्स्ट लूक रिलीज - love in vietnam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.