ETV Bharat / entertainment

कृतिका मलिकनं धक्कादायक विधान; बिग बॉसमध्ये खळबळ, पती अरमान मलिकलाही धक्का - bigg boss ott 3 - BIGG BOSS OTT 3

Bigg boss ott 3 : कृतिका मलिकनं 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'च्या ताज्या एपिसोडमध्ये एक धक्कादायक विधान केलं आहे. यानंतर आता ती चर्चेत आली आहे.

Bigg boss ott 3
बिग बॉस ओटीटी 3 ((YouTuber Armaan Malik - Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 1:20 PM IST

मुंबई Bigg Boss Ott 3 : यूट्यूबर अरमान मलिकनं 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'च्या प्रीमियर एपिसोडमध्ये त्याच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतिका मलिकसह प्रवेश केला. त्यानं बिग बॉसमध्ये आपल्या दोन्ही पत्नींबरोबर प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांपासून ते अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पायल मलिक अनेकवेळा अरमान आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना आणि तिचं दु:ख व्यक्त करताना शोमध्ये दिसली. याबद्दल बोलताना ती अनेकदा भावूक देखील झाली. आता 'बिग बॉस ओटीटी 3'च्या एपिसोडमध्ये, अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकनं अरमानबरोबरच्या लग्नाबाबत एक विधान केलंय.

कृतिका मलिकनं केलं विधान : पौलोमी दासनं कृतिकाला अरमानचा टॉवेल वापरण्याच्या तिच्या सवयीबद्दल विचारलं, तेव्हा हे सर्व सुरू झालं. पौलोमीनं कृतिकाला विचारलं, "तुम्ही एकमेकांचा टॉवेल वापरता?" यावेळी अरमान देखील तिथं उपस्थित होता, तो पौलोमीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणला, "माझी पत्नी आहे, मी वापरू शकत नाही का? नाही वापरायला पाहिजे का?" यानंतर कृतिकानं केलेल्या वक्तव्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कृतिकानं अरमानला अडवलं. यावेळी तिनं अतिशय धक्कादायक वक्तव्य केल्यानं पौलोमी जोरात हसायला लागली. यानंतर कृतिकानं "मी स्वतःचं माझा अपमान करेन जर बाकी कोणी काही बोललं, तर त्याचं नक्की तोंड फोडेल."

अरमान मलिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल : अरमान मलिक 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'मध्ये पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिकबरोबर आल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल खूप चर्चा झाल्या. या शोमध्ये सना मकबूल देखील अरमानच्या दोन लग्नाबद्दल अरमान मलिकबरोबर बोलताना दिसली. सनानं त्याला विचारलं होतं की, "पायलनं दुसरं लग्न केलं तर तू काय करणार." यावर अरमान चिडतो आणि म्हणतो, "पायलनं एक्सेप्ट केलं आहे, ते मी नाही करू शकत." अरमाननं 2011 मध्ये पत्नी पायल मलिकशी लग्न केलं. यानंतर पायलनं पहिला मुलगा चिरायूला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, 2018 मध्ये, अरमाननं पायलची सर्वात चांगली मैत्रीण कृतिकाशी लग्न केलं. यानंतर 2022 मध्ये, अरमान मलिकनं दोन पत्नी पायल आणि कृतिका यांच्या गरोदरपणाची घोषणा करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. अरमान आता चिरायू, तुबा, अयान आणि झैन या चार मुलांचा पिता आहे.

हेही वाचा :

  1. "आशाताई गाते हे मला ठाऊक नव्हतं," मंगेशकरांनी सांगितल्या 'हृदया'जवळच्या आठवणी - Swaraswamini Asha
  2. इयत्ता 7 वीत शिकवला जात होता तमन्ना भाटियाचा धडा, संतप्त पालकांची तक्रार - Tamannaah Bhatia lesson
  3. "भारतीय चित्रपटाचा ध्वज उंच फडकत राहो" म्हणत, चिरंजीवींनी केलं 'कल्की'च्या निर्मात्यांचं कौतुक - Kalki 2898 AD

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.