ETV Bharat / entertainment

एल्विश यादव सापडला अडचणीत, ईडीनं बजावला नवीन समन्स - EVISH YADAV - EVISH YADAV

elvish yadav : एल्विश यादवला ईडीनं नवीन समन्स बजावले आहे. 23 जुलै रोजी एल्विशला चौकशीसाठी लखनौला जावं लागणार आहे.

elvish yadav
एल्विश यादव (एल्विश यादव)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 1:09 PM IST

मुंबई - elvish yadav : प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एल्विश यादवला 23 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा आणि सापाच्या विषाचा वापर करण्यासंबंधातलं आहे. एल्विशला 23 जुलै रोजी लखनौला चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी ईडीनं एल्विशला नोटीस देऊन 8 जुलै रोजी बोलावलं होतं, मात्र त्यानं परदेशात असल्याचं कारण सांगत ईडीसमोर हजर होण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. यानंतर ईडीनं मे महिन्यात एल्विशविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

एल्विश यादवची होईल चौकशी : दरम्यान एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही ईडी चौकशी करणार असल्याचेही आता समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशवर मोठी कारवाई होऊ शकते. एल्विश यादवबरोबर ईडी मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचं समजत आहे. याआधी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ईडी एल्विशवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत.

सापांची तस्करी : एल्विश हा 'बिग बॉस ओटीटी 2' या रिॲलिटी शोचा विजेता आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीपल फॉर ॲनिमल्स या एनजीओच्या तक्रारीवरून नोएडातील सेक्टर 49 पोलीस ठाण्यात, एफआयआर दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपींना अटक करण्यात आली होती, यात एल्विशचादेखील समावेश आहे. 3 नोव्हेंबरला नोएडाच्या बँक्वेट हॉलमधून या सर्पमित्रांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळ पाच कोब्रासह नऊ साप आढळून आले, याशिवाय 20 मिली सापाचे विषही जप्त करण्यात आलं होतं. या आरोपींवर सापांची तस्करी, अंमली पदार्थांचा वापर आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्याचे आरोप आहेत.

हेही वाचा :

1 दिल्ली एयरपोर्ट पर सुरक्षाकर्मियों ने एल्विश यादव को रोका, विदेश जाने की थी तैयारी - Elvish stopped at delhi airport

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.