ETV Bharat / entertainment

'तू माझी हिरोईन आहेस' 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला भेटायला आली मैत्रिण, व्हिडिओ व्हायरल - SURAJ CHAVANS VIDEO VIRAL

Suraj Chavan Kajal Shinde Video: 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Suraj Chavan Kajal Shinde Video
सुरज चव्हाण आणि काजल शिंदेचा व्हिडिओ (सूरज चव्हाण (Source - ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 1:45 PM IST

मुंबई - बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी 5'मुळे चर्चेत आला होता. तो यावेळच्या सीझनचा विजेता ठरला असून त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं अनेकदा 'बिग बॉस'च्या घरात तोच विजयी होणार असल्याचं म्हटलं होत. हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर आता तो सतत चर्चेत आहे. दरम्यान सूरज चव्हाणनं जिंकलेली ट्रॉफी आता त्याच्या गावाला पोहचली आहे. गावात गेल्यानंतर सूरजला अनेकजण भेटण्यासाठी येत आहे.आता त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सूरज चव्हाणचा मैत्रिणीबरोबरचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये सूरज हा एका मुलीबरोबर बोलताना दिसत आहे. ही मुलगी सूरजची मैत्रिण असून तिचं नाव काजल शिंदे असल्याचं समजत आहे. व्हिडीओत काजल सूरजला विचारते, 'विसरलाय होय मला.' यावर सूरज उत्तर देतो, 'नाही नाही तू माझी हिरोईन आहेस.' यानंतर काजल म्हणते, मला वाटलं की तू मला विसरला असणार.' तितक्यात कोणीतरी निक्की त्याची बहिण असल्याचं म्हणतो. यानंतर काजल ही सूरजच अभिनंदन करते आणि असाच आयुष्यात पुढे जा असे म्हणते. त्याचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सूरजनं अनेकांचं मन जिंकलं होतं.

सूरज चव्हाणच्या व्हिडिओवर यूजर्सच्या कमेंट्स : सूरजला संपूर्ण महाराष्ट्रामधून सपोर्ट होता. आता सूरजच्या या व्हिडिओवर एका यूजर्सन कमेंटमध्ये लिहिलं, 'भाऊच्या पायात कधी चप्पल दिसत नाही.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मला तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप आवडतात' आणखी एकानं लिहिलं, 'वाईट काळात ज्यांनी साथ दिली त्यांना चांगला स्वभाव असलेला माणूस विसरत नाही.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोज पोस्ट करत आहेत. दरम्यान सूरज चव्हाणला 'बिग बॉस मराठी'चा भाग व्हायचं नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याची कोणीतरी मस्करी करत आहे. यानंतर चॅनलच्या लोकांनी त्याला विश्वासात घेतलं. यानंतर त्यानं या शोसाठी होकार दिला. सूरज 'बिग बॉस मराठी 5' ट्रॉफीचा विजेता ठरल्यानंतर त्याला 14.6 लाख रुपये आणि इतर भेटवस्तू मिळाल्या. याशिवाय त्याची भविष्यात कुणीही आर्थिक फसवणूक करू नये यासाठी होस्ट रितेश देशमुखनं त्याच्यासाठी मॅनेजरची व्यवस्था देखील केली आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस'मराठी फेम सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पाहा व्हिडिओ
  2. गावाकडं घर बांधून त्याला 'बिग बॉस' नाव देणार; 'झापुक झुपुक' सूरज चव्हाणनं खेड्यातील तरुणांना केलं 'हे' आवाहन
  3. 'गुलिगत धोका' देत सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता; मरी आई पावली - Bigg Boss Winner Suraj Chavan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.