ETV Bharat / entertainment

रितेश देशमुखनं 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार वैभव चव्हाणला धारेवर, प्रेक्षकांना आली महेश मांजरेकर यांची आठवण - riteish deshmukh - RITEISH DESHMUKH

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचा 'बिग बॉस मराठी 5' हा शो खूप गाजत आहे. मात्र या शोसाठी होस्ट म्हणून महेश मांजरेकर योग्य असल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहेत. दरम्यान आज शोमध्ये वैभव चव्हाणला रितेश देशमुख हा फटकारेल.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 1:56 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 5' हा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होत आहे. 'बिग बॉस मराठी' 5 शोनं आता तिसरा आठवडा पूर्ण केला आहे. दरम्यान भाऊचा धक्का प्रेक्षकांना पाहायला खूप आवडत असून याला टीआरपीही चांगली मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'चे याआधी महेश मांजरेकर होस्ट होते. आता पाचव्या सीझनमध्ये होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. हा शो दिवसेंदिवस खूप मनोरंजक होत चालला आहे. दरम्यान रितेश देशमुखच्या होस्टिंगचं कौतुक काही चाहते करत आहेत.

महेश मांजरेकर यांनी करावी शोमध्ये एंट्री : याशिवाय काहीजण रितेशला होस्टिंग बंद करण्याचा सल्ला देत आहेत. आता अनेकांना महेश मांजरेकर या शोमध्ये हवे आहेत. याबद्दल आता अनेकजण सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देऊन याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात दोन टीम ए ( A)आणि बी (B)आहेत. या शोमध्ये नियमांनुसार खेळणाऱ्या टीम बीला आता पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक आता संतापले आहे. यानंतर आता काही प्रेक्षक महेश मांजरेकर यांना होस्ट म्हणून पुन्हा परत आणावं असं म्हणत आहे.

रितेश देशमुखनं वैभवला फटकारेल : दरम्यान बिग बॉस निर्मात्यांकडून एक सोशल मीडिया नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, यामध्ये भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांची शाळा घेतली जात आहे. आजच्या एपिसोडमध्ये घरामधील स्पर्धकांबद्दल महाराष्ट्र काय विचार करतो हे दाखविण्यात येईल. आता व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये रितेश हा घरातील सदस्याबरोबर बोलताना म्हणतो, "तुमच्याबद्दल महाराष्ट्र काय विचार करतो, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहोत. यानंतर वैभव चव्हाण आणि घनश्याम दरोडे यांना महाराष्ट्राची जनता कमजोर असल्याचं म्हणतात. महाराष्ट्राच्या जनतेचा संदेश हा स्वत:हा वैभव वाचतो. तसेच अभिजीत सावंत पुढील संदेश वाचत म्हणतो, "तुझ्या सारख्या पाउडर लागण्याऱ्या लोळवलं आहे." यानंतर धनंजय पोवार संदेश वाचत म्हणतो, "निक्की गॅगबरोबर कधी भिडणार." यावर तो हसतो आणि म्हणतो "मी आतापर्यंत कोणाबरोबर भिडलो नाही." आजचा एपिसोड हा खूप जोरदार असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सूरज चव्हाणला सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा - Bigg Boss Marathi Suraj Chavan
  2. 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, निक्की तांबोळी करणार कॅप्टन्सी टास्कदरम्यान राडा - bigg boss marathi 5
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता वालावलकर आणि पंढरीनाथ कांबळेबरोबर निक्की तांबोळीनं केला वाद - Bigg Boss Marathi Season 5 Day 16

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.