ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळीनं वर्षा उसगावकरबद्दल केलं वक्तव्य, आली चर्तेत - VARSHA USGAONKAR

'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळीनं आता वर्षा उसगांवकर यांच्यावर विधान केलं आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या...

बिग बॉस मराठी 5
bigg boss marathi 5 (बिग बॉस मराठी 5 (instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 22, 2024, 1:44 PM IST

मुंबई : अभिनेत्री निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घरात वाद करत असल्यामुळे खूप चर्चेत होती. आता तिनं हा शो संपल्यानंतर काही गोष्टी शेअर केल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'मध्ये निक्कीचे घरातील स्पर्धकांबरोबर खूप भांडणं झाली होती, हे अनेकांना माहित आहे. याशिवाय तिचं फक्त घरात अरबाज पटेलबरोबर पटत होतं. या शोमध्ये निक्की आणि अरबाजमध्ये जवळीता निर्माण झाली होती. यानंतर दोघेही खूप चर्चेत होते. दरम्यान 'बिग बॉस मराठी 5'च्या 70 दिवसांच्या प्रवासात कोणत्या गोष्टीची खंत आहे का?, असा प्रश्न तिला विचारण्यात आल्यानंतर तिनं यावर एक चांगल उत्तर दिलं आहे.

निक्की तांबोळीनं केलं वर्षाताईंवर विधान : निक्की तांबोळीनं वर्षा उसगांवकर यांच्या नावाचा उल्लेख करत म्हटलं, "मला 'बिग बॉस'च्या प्रवासातील कुठल्याही गोष्टीचा खंत वाटत नाही, फक्त एकाच गोष्ट आहे, जी मला चांगली वाट नाही. मी वर्षाताईंबरोबर उद्धटपणे बोलले. मी त्यांना गेममधून बाहेर येण्यापूर्वी माफी मागितली होती, यानंतर त्यांनी मला माफ केलं होतं. त्यामुळे आता मला काहीही वाटत नाही. ट्रॉफी कोणालाही द्या मी माझं काम केलं. मला शो हा गाजवायचा होता आणि मी ते केलं." यानंतर निक्कीनं वर्षा उसगांवकर यांना ओळखत नसल्याचं देखील यावेळी बोलताना सांगितलं. पुढं तिनं म्हटलं, "बिग बॉस मराठी 5'मध्ये घरात अनेक स्टार्स येत होते आणि ते वर्षाताईंशी खूप चांगल्या पद्धतीनं बोलत होते यानंतर मला, त्या मोठ्या अभिनेत्री असल्याचं माहित झालं."

निक्की तांबोळीनं केलं वर्षाताईला फॉलोबॅक : यानंतर निक्कीला एका संवादादरम्यान सांगण्यात आलं की, वर्षाताईंना तुझी माफी ही खोटी असल्याची वाटते. यावरून तिनं उत्तर दिलं, "मी स्पष्टीकरण द्यायला जन्म घेतलेला नाही. मी खरी आहे, मी मनापासून माफी मागितली आहे. आता वर्षाताईंना माझी माफी कितपत खरी वाटते हे त्यांच्यावर आहे. जर त्यांना वाटतंय की, ही एक स्ट्रॅटर्जी होती, तर बाहेर आल्यावर त्यांनी मला फॉलो केलं. यानंतर मला चाहत्यांनी सांगितलं की, वर्षाताईंनी तुम्हाला फॉलो केलंय, तर प्लीज त्यांना फॉलोबॅक करा. मी त्याच्याबरोबर घरात चांगली वागली नाही याची मला कुठेतरी खंती होती, मात्र मी त्यांना एक प्रेरणादायी महिला म्हणून बघते, यामुळेचं मी त्यांना फॉलोबॅक केलं." आता निक्की आणि अरबाज अनेकदा एकत्र दिसतात. त्यांच्यात आता देखील चांगली मैत्री आहे.

हेही वाचा :

  1. 'तू माझी हिरोईन आहेस' 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला भेटायला आली मैत्रिण, व्हिडिओ व्हायरल
  2. 'बिग बॉस'मराठी फेम सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पाहा व्हिडिओ
  3. गावाकडं घर बांधून त्याला 'बिग बॉस' नाव देणार; 'झापुक झुपुक' सूरज चव्हाणनं खेड्यातील तरुणांना केलं 'हे' आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.