ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी छोटा पुढारी आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद! - Bigg Boss Marathi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 2:01 PM IST

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी 5' शो आता खूप रंजक बनला आहे. या शोमध्ये आजच्या एपिसोडमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरोडेमध्ये वाद होताना दिसेल.

Bigg Boss Marathi Season 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. 'बिग बॉस'च्या घरात नेहमीच कोणत्याही कारणामुळे भांडणं होताना दिसतात. आता तीन आठवड्यांतच घरात सदस्यांमध्ये नाती निर्माण झाली आहे. घनश्याम दरोडे आणि निक्की तांबोळी यांच्या बहीण-भावाचं नातं निर्माण झालं. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशीच या दोघांमध्ये वाद होताना दिसणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये निक्की आणि घन:श्याममध्ये वाद होईल. 'बिग बॉस मराठी'घरात वीकेंडला झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना होस्ट रितेश देशमुखनं चांगलंच सुनावलं होतं.

घनःश्याम आणि निक्कीमध्ये वाद : आधीच 'बिग बॉस'च्या घरात दोन गट पडले आहेत. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी घनःश्याम दरोडेला म्हणते, "तू फेक आहेस." यानंतर घनश्याम तिला विचारतो, "काय फेक वागलो ते सांग, तू कशी आहे, हे अख्ख्या जनतेला दिसलं आहे. मी तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता." यानंतर लगेच निक्की म्हणते,"नको देऊ दर्जा." यावर घनःश्याम म्हणतो, "निक्कू ताई बोलल्यामुळे घात झालाय ना माझा." प्रोमोमध्ये घनःश्याम हा खूप दुखावला असल्याचा दिसत आहे. निक्की आणि घनःश्याममध्ये कशामुळे वाद झाला याबद्दल आज कळणार आहे. सध्या निक्की आणि घनःश्याम यूजर्सच्या निशाण्यावर आहेत.

घनःश्याम दरोडे आणि निक्की तांबोळी झाले ट्रोल : या दोघांना सोशल मीडियावर काही यूजर्स ट्रोल करत आहेत. एका यूजरनं व्हायरल प्रोमोच्या कमेंट विभागात लिहिलं, "बहीण आणि भावाचे होपलेस प्रेम." दुसऱ्या एकानं लिहिलं, "रक्षाबंधनला निक्कीनं राखी बांधू नये म्हणून छोटा पुढारीनं गेम खेळला आहे जाणून बुजून भांडण केले असावे." याशिवाय काहीजण या व्हिडिओ फायर इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान 'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात डबल एलिमिनेशन झाले. यामध्ये योगिता चव्हाण आणि निखिल दामले या दोघांना घरातून बाहेर पडावे लागले. या आठवड्यात निखिल दामले, अभिजीत सावंत, योगिता चव्हाण आणि सूरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले होते.

हेही वाचा :

  1. रितेश देशमुखनं 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार वैभव चव्हाणला धारेवर, प्रेक्षकांना आली महेश मांजरेकर यांची आठवण - riteish deshmukh
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सूरज चव्हाणला सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा - Bigg Boss Marathi Suraj Chavan
  3. 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, निक्की तांबोळी करणार कॅप्टन्सी टास्कदरम्यान राडा - bigg boss marathi 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.