ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी होणार जोरदार टक्कर, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' या शोमध्ये रोजच काही वेगळं पाहायला मिळतं. नवीन व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी घरातील सदस्यांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 3:16 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' हा शो अनेक प्रेक्षकांना आवडत आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात नवीन टास्क आणि नवीन राडा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आज बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडेल. या टास्कदरम्यान घरात सदस्यांमध्ये चांगलाच कल्ला, राडा, आणि गोंधळ होताना दिसेल. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटताना दिसत आहे. या आठवड्यात वर्षा उसगावकर या कॅप्टन आहेत. आता पुढच्या आठवड्यात घरामध्ये कोण कॅप्टन होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क : सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य बससाठी धडपड करताना दिसत आहेत. प्रोमोत अंकिता वालावलकर ही पंढरीनाथ कांबळेला विचारते, "गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट तुमचं कन्फर्म करू का?" यावर पंढरीनाथ म्हणतो, "माझ बुकिंग झालंय." यानंतर अरबाज पटेल म्हणतो, "घनश्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो." यावर अभिजीत त्याला म्हणतो, "घनश्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?" यानंतर शेवटी पंढरीनाथ हा मस्करीमध्ये घनश्यामला गुच्छा मारेल तुला असं म्हणतो. यावर घनश्याम उत्तर देतो, "आधीच जवळच्या व्यक्तींनी मला गुच्छा मारला आहे." बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन होण्यासाठी सर्वच सदस्य धडपड करताना प्रोमोमध्ये दिसत आहेत.

निक्कीनं केलं घरातील काम : याशिवाय आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नक्की तांबोळी ही घरातील काम करताना दिसत आहे. ती घरामधील सदस्यांसाठी चहा बनवतेय हे पाहून सगळ्यांना आनंद होतो, कारण यापूर्वी तिनं घरातील कामे करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रोमोमध्ये अंकिता म्हणते, "इतका गोड सुगंध खीरसारखा कुठून येत आहे." यावर अरबाज पटेल म्हणतो, "चहा कोणी बनवला आहे, ते आधी पाहा." यानंतर घनश्याम हा जान्हवी किल्लेकरबरोबर स्वत:बद्दल बोलताना दिसतो. यानंतर वैभव चव्हाणला अंकिता बाहेर येताना दिसते, यानंतर तो तिला विचारतो? "निक्की काम करत आहे का?" यावर अंकिता म्हणते, "हो तिनं घरातील सर्व सदस्यांसाठी चहा बनवला आहे आणि आणखी काही काम करायचं का हे देखील विचारलं आहे." यावर जान्हवी म्हणते, "तिला आता जेवण द्यायचं का?" यावर वैभव म्हणतो, "घरातील सर्व काम करत आहेत तर तिला द्यावं लागेल." यानंतर अंकिता म्हणते, "ती घरातील सर्व काम करत आहे, फक्त ओटा साफ करत नाही." आता हा प्रोमो चाहत्यांना आवडला आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'च्या नवीन टास्कमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात झाली लढत - bigg boss marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घरातील नॉमिनेशन टास्कमुळे जान्हवी आणि घनश्यामध्ये होईल झुंज - bigg boss marathi
  3. निक्की-अरबाजमध्ये जवळीकता वाढल्यानं 'ही' व्यक्ती नाराज, थेट सोशल मीडियावर केली पोस्ट - BOSS MARATHI 5 PROMO VIRAL

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.