ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाद झाल्यानंतर घरातील सदस्यांनी घेतली अरबाज आणि निक्कीची फिरकी - BIGG BOSS MARATHI

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 1:50 PM IST

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या एपिसोडमध्ये निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात जोरदार वाद झाले होते. आता आजच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्य या दोघांची फिरकी घेताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

मुंबई Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात मंगळवारी निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणं झाली होती. अरबाजला निक्की आणि अभिजीतमधील मैत्री आवडत नसल्यानं घरात खटके उडाले होते. वादावादी आणि संतापामध्ये अरबाजनं घरातील वस्तूंची आदळ-आपट केली. यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण तणावाचे झाले होते. आता घरात शांतता निर्माण झाली आहे. घरातील सदस्य या भांडणावरून निक्की आणि अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक प्रोमो इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात सूरज आणि आर्या हे निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक गाणं गाताना दिसत आहेत.

निक्की आणि अरबाजची घेतली फिरकी : यानंतर घरातील इतर सदस्यही या तिघांची फिरकी घेताना दिसत आहेत. आज 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये घरातील वातावरण हे शांत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. निक्कीनं आता टीम 'ए' सोडली आहे. यानंतर तिला बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंतचा पाठिंबा मिळत आहे. निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र राहिल्यानंतर यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळत आहे. दरम्यान आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण हे तिघेही किचनमधल्या कामावरून बोलताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेची 'तू तू मैं मैं' धमाल दाखविण्यात आली आहे.

नॉमिनेट झालेले सदस्य : हा शो दिवसेंदिवस खूप रंजक होत आहे. 'बिग बॉस' शोच्या पाचव्या आठवड्यात अभिजीत, अरबाज, निक्की, वर्षा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशनसाठी 'मानकाप्या' हे कार्य पार पडलं होतं. घरातील सदस्य सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले आहेत. यामुळे नॉमिनेशनही जोड्याचं झालय. यात अभिजीत-निक्की आणि वर्षा-अंकिताची जोडी नॉमिनेट झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण अभिजीत आणि निक्कीच्या जोडीला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता या आठवड्यात कुठला सदस्य घराबाहेर पडेल हे काही दिवसातच समजेल.

हेही वाचा :

  1. अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीच्या मैत्रीमुळे अरबाज पटेल नाराज, घरात केला राडा - Bigg Boss Marathi 5
  2. 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरचा रांगडा गडी करतोय 'कल्ला', धनंजय पोवारांची आई म्हणतेय 'आगे आगे देखिये होता है क्या...' - Bigg Boss Marathi 5
  3. अरबाज पटेलची कॅप्टन्सी धोक्यात, घरातील सदस्याच्या सोईसुविधांसाठी करणार त्याग? - Bigg Boss Marathi 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.