मुंबई - रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' सुरू होऊन आता एक महिना पूर्ण होणार आहे. नायरा बॅनर्जीपासून मुस्कान बामणेपर्यंत अनेक सदस्य घरातून बाहेर पडले आहेत. दरम्यान मंगळवारी पुन्हा घरामध्ये नामांकन प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वाधिक करन्ट ज्याला भेटले तो या आठवड्यात नॉमिनेट होणार असल्याचं बिग बॉसनं घोषणा केली होती. याशिवाय घरात खूप भांडणही देखील पाहायला मिळाली. करणवीर मेहरा अविनाश मिश्रावर इतका चिडला आहे की, त्याला झापड मारायची गोष्ट शिल्पा शिरोडकरबरोबर त्यानं केली.
सदस्याला करन्ट बसला : दरम्यान नामांकन प्रक्रियेत यावेळी उमेदवारी देणाऱ्या सदस्यालाही करन्ट बसणार आहे. शहजादा धामीनं शिल्पा शिरोडकर आणि ॲलिस कौशिक यांना नॉमिनेट केलं. श्रुतिका राजनं अविनाश मिश्रा आणि शिल्पा शिरोडकरला नॉमिनेट केलं. ईशानं अरफीन खान आणि चाहत पांडे यांना नॉमिनेट केलं होतं. याशिवाय यावेळी ईशानं यावेळी अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या तिला चाहतबद्दल आवडत नाही. चुम दरांगनं नॉमिनेशनसाठी जाण्यापूर्वी सर्वांची अगोदर माफी मागतली यानंतर 'बिग बॉस'नं व्यत्यय आणला आणि म्हटलं, "असे असेल तर कोणालाही नॉमिनेट करू नका." यानंतर ती परत जाऊन बसते.
Taking stand for chahat 🔥 once he said be a man and he proved it too
— thakurrrr ! (@nakul_pratap_) October 29, 2024
This is @KaranVeerMehra for you ! 🙌🏻#KaranveerMehra #BiggBoss18 #BB18 pic.twitter.com/PMb0nk96k6
Shehzada nominated Alice and Shilpa. #bb18 #biggboss18 #AliceKaushik pic.twitter.com/OxoHa52E0A
— Ankit Gupta fan (@jahaan13223) October 29, 2024
queen #ChahatPandey while nominating Eisha: INKA AVINASH KE ALAAVA GHAR MEIN JOI ASTITVA HEE NAHI HAI 😭#BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/Xals97i8KJ
— rachit (@beingrachit_) October 29, 2024
कोण झालं नॉमिनेट ? : यानंतर शिल्पा शिरोडकर ॲलिस आणि शहजादा यांना नॉमिनेट करते. याशिवाय अविनाशला नॉमिनेट करताना चाहत म्हणते की, "तो चांगलं बनण्याची एक्टिंग करतो." ईशाला नॉमिनेट करताना ती म्हणते, "ती फक्त अविनाशची असिस्टंट आहे. घरात तिचं काहीही अस्तित्व नाही." यानंतर ॲलिस शहजादाचं नाव घेते आणि करणवीर मेहराला शिवीगाळ केल्याबद्दल नामांकित करते. तजिंदर ईशाचं नाव घेत अविनाशच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं यावेळी सांगतो आणि तो ॲलिसचं नाव घेतो. रजत दलाल श्रुतिका आणि विवियनला नॉमिनेट करतो. अविनाश हा अरफीन आणि श्रुतिकाला नॉमिनेट करतो. याशिवाय अरफीन श्रुतिका आणि ईशाची यांना नॉमिनेट करतो. करणवीर ॲलिस आणि अविनाश यांची नावे घेतो. विवियन शहजादा आणि श्रुतिका यांना नॉमिनेट करतो.
या आठवड्यात 7 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलंय : बिग बॉसनं एक घोषणा करून सांगितलं होतं की, त्याला 13 घरातील सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी हवी आहे, यानंतर ही संधी त्यांना मिळाली. आता शहजादा, ईशा, अविनाश, श्रुतिका, आणि ॲलिस आणि अरफीन, शिल्पा यांना जास्त मतांमुळे सर्वाधिक नामांकन मिळाले आहे. नामांकन प्रक्रियेनंतर अनेक घरातील सदस्यामधील नाती बिघडली आहे. दुसरीकडे विवियनची ईशा, ॲलिस आणि अविनाशबरोबर मैत्री वाढत आहे. करणवीर आणि विवियनच्या मैत्रीत दुरावा निर्माण होताना सध्या घरात दिसत आहे.
हेही वाचा :