ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या 'बिग बॉस 18'मध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टीनं लावली हजेरी...

'बिग बॉस 18'च्या वीकेंड का वारमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टीनं पाहूणे म्हणून आगमन केलं. आता शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बिग बॉस 18
bigg boss 18 (बिग बॉस १८ (बिग बॉस 18 (@colorstv Instagram)))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई : सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. हा शो अनेकांना आवडत आहे, तर काही लोकांना हा सीझन खूपच कंटाळवाणा वाटत आहे. 3 आठवड्यांपासून घरात एकच मुद्दा चालू आहे, तो म्हणजे राशनबद्दल. सुरुवातीपासूनच कुटुंबातील सदस्य फक्त खाण्यावरून एकमेकांशी शोमध्ये भांडताना दिसत आहेत. याशिवाय शोमध्ये असे काही चेहरे आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. दरम्यान 'बिग बॉस 18'मध्ये सतत टॉप 5 मध्ये काही स्पर्धक असतात. आता यावेळी अविनाश मिश्रा टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. दरम्यान रजत दलाल घरात पहिल्या क्रमांकावर आहे.

कोण झालं बेघर : रजत दलालनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि सलग तिसऱ्यांदा टॉप 1 रँकिंग मिळवले आहे. या आठवड्यातही रजत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान 'बिग बॉस 18'चा वीकेंड का वार शनिवार आणि रविवारी सलमाननं पुन्हा एकदा घरातील स्पर्धकांची क्लॉस घेतील. यावेळी 'भाईजान'नं अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा चांगलचं फटकारलं आहे. याशिवाय सलमान खाननं रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुनचं कौतुक केलंय. 'बिग बॉस 18'च्या घरातून यावेळी दोन स्पर्धक बेदखलही झाले आहेत. मुस्कान बामनेनंतर नायरा बॅनर्जी देखील बेघर झाली आहे. यासोबतच सलमान खान, अजय देवगणची जोडी वीकेंड का वारमध्ये मस्ती करताना दिसली.

अजय देवगण आणि सलमान खानची धमाल : अजय देवगणबरोबर यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टीनं देखील 'बिग बॉस'च्या स्टेजवर धमाल केली. अज आणि रोहित यांचा दिवाळीच्या मुहुर्तावर 'सिंघम अगेन' हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाटत पाहात आहेत. दरम्यान घरात करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यामध्ये सर्वात काळे हृदय कोणाचे आहे, असा प्रश्न सलमान खाननं घरातील सदस्यांना केला होता. यावरही घरामध्ये चर्चा होताना दिसली. याशिवाय घरामध्ये आता पुढं प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस सीझन 18'मधून मुस्कानला बाहेरचा रस्ता, राशनसाठी नायरा आणि अ‍ॅलिसमध्ये वाद
  2. श्रृतिका ठरली बिग बॉसच्या घरात लाडली, मुस्कानवर बाहेर होण्याची टांगती तलवार
  3. आश्वासनांचा पाऊस पडूनही निवडणुकीचा धक्कादायक निकाल, सत्तेपासून 'दलाल' वंचित !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.