मुंबई - सलमान खानने 6 ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस'च्या 18 व्या सीझनला धमाकेदार सुरुवात केली आहे. 'टाइम का तांडव' अशी थीम अललेल्या या शोमध्ये प्रेक्षकांना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा एक रोमांचक मेळ पाहायला मिळेल. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित होणाऱ्या या भव्य प्रीमियर शोमध्ये, 18 स्पर्धक 50 लाखाचं बक्षीस आणि ट्रॉफीसाठी एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत.
'बिग बॉस'च्या या नव्या सीझनममध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. हे स्पर्धक त्यांच्या क्षेत्रातील तगडे खेळाडू असून यामध्ये संपूर्ण भारतातील फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीसह सेलेब्रिटी सहभागी करण्यात आले आहेत. या नावाजलेल्या स्पर्धकांचा थोडक्यात परिचय खालील प्रमाणे आहे.
चाहत पांडे:
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असलेल्या चाहत पांडेने 'तेनाली राम', 'हमारी बहू सिल्क', 'लाल इश्क' आणि 'दुर्गा माता की छाया' सारख्या शोमध्ये काम केलं असून तिनं आता 'बिग बॉस 18' मध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या मध्ये प्रदेश विधानसभा निवडणुकीत चाहतचा मध्य प्रदेशातील दमोहमधून आम आदमी पक्षाकडून पराभव झाला होता. तिला 2,292 मते मिळाली. या निवडणुकीत भाजपचे जयंत मलाय्या विजयी झाले होते.
शहजादा धामी :
शहजादा धामी हा देखील एक टीव्ही अभिनेता असून तो 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या शोमध्ये दिसला आहे. शहजादा धामी आणि त्याची सहकलाकार प्रतीक्षा होनमुखे यांना सेटवर गैरवर्तन केल्याच्या आरोपांमुळे 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून काढून टाकण्यात आले होते.
शिल्पा शिरोडकर:
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचे शोचा होस्ट असलेल्या सलमान खाननं जोरदार स्वागत केलं. शिल्पाला ९० च्या दशकातील सेन्सेशनल क्वीन म्हटलं जातं. शिल्पा ही साऊथ स्टार महेश बाबूची मेहुणी आणि नम्रता शिरोडकरची बहीण आहे.
अविनाश मिश्रा :
अविनाश मिश्रा चाहत पांडेचा सहकलाकार होता. 'ये तेरी गलियाँ' आणि 'इश्कबाज' सारख्या शोमध्ये तो दिसला आहे. चाहत आणि अविनाश या शोमध्ये एकत्र आल्यानं बऱ्याच रंजक गोष्टी उघड होतील.
तजिंदर सिंग बग्गा:
वादग्रस्त नेते तजिंदर सिंग बग्गा हे भाजपाच्या युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव होते. याशिवाय बग्गा हे उत्तराखंड भाजपा युवा शाखेचे प्रभारीही आहेत.
श्रुतिका अर्जुन :
तमिळ अभिनेत्री श्रुतिका अर्जुन ही सलमान खानच्या चाहत्यांपैकी एक आहे. घरात येण्यापूर्वी तिनं गमतीनं म्हटलं होतं की तिनं चार सिनेमे केले पण चारही फ्लॉप झाले होते.
तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये काम केलेली नायरा बॅनर्जी तगडी स्पर्धक असून तिनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. नायरा हिनं 'पिशाचिनी' आणि 'दिव्य दृष्टी' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
करण वीर मेहरा आणि इतर स्पर्धक :
करण वीर मेहरानं अलीकडे 'खतरों के खिलाडी' हा शो जिंकला होता आणि तो 'कपल ऑफ मिस्टेक्स' या वेब सीरिजचा एक भाग होता. यामध्ये तो बरखा सेनगुप्तासह दिसला होता. याशिवाय 'बधाई दो' चित्रपटाची अभिनेत्री चुम दरंग, 'अनुपमा' शोचा मुस्कान बामणे, हृतिक रोशनचा लाईफ कोच अरफीन खान आणि त्याची पत्नी सारा, हेमा शर्मा उर्फ विरल भाभी, गुणरत्न सदावर्ते, विवियन डिसेना आणि एलिस कौशिक या शोमध्ये दिसणार आहेत.
गाढवाची स्पेशल एंट्री :
सलमान खाननं 'बिग बॉस 18' च्या ग्रँड प्रीमियर नाईटचा अंतिम स्पर्ध म्हणून 'गधराज' या गाढवाची ओळख करुन दिली. हा शोमध्ये त्याचीही महत्त्वाची भूमिका असेल. आता या 'गधराज' गाढवासह 18 स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात गेले आहेत. स्पर्धकांना आता या गाढवाचीही काळजी घ्यावी लागणार आहे.