मुंबई - 'बिग बॉस १८'मध्ये बुधवारी रात्रीचा एपिसोड सनसनाटी होता. अविनाशच्या बरोबर जेलमध्ये अरफीन खान बंद झाला आणि त्यानं बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून असलेली त्याची पत्नी सारा हिला इथं यायला नको होतं असं म्हटलं. यानंतर 'बिग बॉस'नं ही गोष्ट जाहीर केली आणि साराला या घरात राहण्याची केवळ 24 तासांची मुदत मिळाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे इतर सदस्यही हैराण झाले. या धक्क्यानं सारा खचली, तिनं रडून नवऱ्याबरोबर वाद घातला, परंतु अरफीन आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
सारा आणि अरफीन खानच्या वैवाहिक जीवनाच्या गोष्टी समोर : बिग बॉसमध्ये एकत्र स्पर्धक म्हणून आलेल्या सारा आणि अरफीन खान यांच्या संसारातील अनेक गोष्टी यामुळे राष्ट्रीय वाहिनीवर पहिल्यांदाच चव्हाट्यावर आल्या. "सारा ही कोमल हृदयाची आहे. बिग बॉसमध्ये घडणाऱ्या घटना तिला सहन होणार नाहीत. यापूर्वीही ती अनेकवेळा अशा प्रसंगामध्ये खचलेली आहे. त्यामुळे ती इथं येऊ नये ही आपली इच्छा होती", असं सेलेब्रिटी माईंड कोच असलेल्या अरफीनचं मत होतं. " हळं हृदय असणं हा मायनस पॉईंट नाही, बिग बॉसमध्ये येणारा प्रत्येकजण काही लोखंडाच्या काळजाचा असत नाही. एकमेकांना समजून घेणं, हळवं होणं ही आपली चुक आहे का?", अशी भूमिका सारानं घेतली. सारावर गुदरलेल्या या प्रसंगानं इतर स्पर्धकही धक्क्यामध्ये गेले. त्यांनी तिला सहानुभुती देण्याचा, तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
सारा हिच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार : "अरफीन हा कितीही माईंड कोच असला तरी साराचीही एक बाजू आहे. ती आपल्या क्षमतेवर 'बिग बॉस'मध्ये आली आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, दर वेळी पतीच्या कवचामध्ये तिला राहण्याची गरज नाही, तीही स्ट्राँग स्पर्धक आहे", असं मत करणवीरनं नोंदवलं. अरफीननं साराच्या गळ्यात एक्सपायरीचा हार घातला. त्यामुळे साराला कोणत्याही नॉमिनेशनशिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागू शकते. पुढील भागात यावर काय निर्णय होईल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील. तोपर्यंत मात्र सारा हिच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार कायम राहणार आहे.
चाहत आणि अविनाशची भांडणे : बुधवारच्या भागाची सुरुवातच एका सनसनाटी प्रसंगानं झाली होती. अविनाश मिश्रा जेलमध्ये झोपलेला असताना चाहत पांडेनं त्याच्या अंगावर पाणी फेकलं आणि त्याला जागं केलं. पहाटे पाच वाजता झालेल्या या प्रकारानं अविनाश खडबडून जागा झाला. त्यानंतर स्वतः चाहत मात्र पाणी टाकून छान झोपी गेली. सर्व सदस्य उठल्यानंतर हा मुद्दा अविनाशनं बनवला. त्यानं सर्व सदस्यांसमोर एका गोष्टीची जाहीर कबुली दिली की, " चाहत आणि मी दोनवर्षापासून एक टीव्ही शो करत होतो. तेव्हापासून ती माझ्या मागे आहे. पण माझं तिच्यावर प्रेम नाही. ती माझ्या सुंदर शरिरावर प्रेम करते, पण मी तिच्यावर प्रेम करत नाही. ती एक गावातून आलेली गँवार मुलगी आहे." या गोष्टीवरुन चाहतनं रान उठवण्याचा प्रयत्न केला. "हा केवळ आपला नाही तर खेड्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा अपमान अविनाशनं केलाय", असं ती म्हणाली. गँवार म्हणणे हे तिला अपमानास्पद वाटलं. अविनाशवर हा डाव उलटावा यासाठी रजत सारख्या स्पर्धकांनी चाहतला भडकवण्याची संधी सोडली नाही. हे सर्व घड असतानाच अचानक अरफीन आणि सारा यांच्यातील नाट्य घडलं आणि चाहत विरुद्ध अविनाश हा सामना अधिक रंगू शकला नाही.
हेही वाचा :