ETV Bharat / entertainment

भुवन बामनं दिल्लीत खरेदी केलं 11 कोटीचं घर ? - 11 कोटीचं घर

Bhuvan Bam : लोकप्रिय यूट्यूबर भुवन बामनं नुकतेच दिल्लीत घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत 11 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर आता भुवननं प्रतिक्रिया दिली आहे.

Bhuvan Bam
भुवन बाम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Bhuvan Bam : लोकप्रिय यूट्यूबर, अभिनेता, गीतकार, कॉमेडियन आणि गायक भुवन बाम हा सोशल मीडिया स्टार आहे. आज भुवन जगभरात खूप प्रसिद्ध आहे. याचा चाहतावर्ग खूप मोठी असून तो अनेकदा वेगवेगळ्या देशात त्याचे कार्यक्रम करत असतो. भुवनला स्टार बनताना लोकांनी पाहिले असले तरी त्यानं त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप परिश्रम केला आहे. दीर्घ संघर्ष आणि मेहनतीमुळे आज तो लोकप्रिय यूट्यूबर बनला आहे. भुवनचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता भुवनबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

भुवन बाम खरेदी केलं दिल्लीत घर : काही दिवसापूर्वी भुवननं दिल्लीत 11 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या बातमीवर भुवननं आता प्रतिक्रिया दिली आहे. राजधानी दिल्लीत 11 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केल्याच्या वृत्तावर मौन तोडत त्यानं सांगितलं, ''हो मी घर घेतले आहे हे खरे आहे, पण त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे हे खरे नाही. मला माहित नाही की मी घर खरेदी केल्याची बातमी कशी समोर आली तर, मी याबद्दल माझ्या घरच्यांनाही सांगितलं नाही. मला माझ्या कुटुंबातील व्यक्तीचे कॉल आले, यानंतर मी या विषयी काही बोलू शकलो नाही. घर खरेदी करणं खूप मोठ असते आणि माझ हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

भुवन बामबद्दल : लोकप्रिय झाल्यापासून भुवननं दोन वेब सीरीजमध्ये काम केल आहे. भुवन हा शेवटी 'राफ्ता राफ्ता' या वेब सीरीजमध्ये दिसला होता. त्याचबरोबर भुवननं 'प्लस मायनस' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केल आहे. याशिवाय भुवन सुपरस्टार सलमान खानच्या टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 15 मध्ये पाहुणे म्हणून दिसला आहे. त्याची 'ताजा खबर' ही वेब सीरीज खूप गाजली होती. या वेब सीरीजमध्ये त्याच्यासोबत श्रीया पिळगांवकर, शिल्पा शुक्ला, नित्य मथुर, जे. डी. चक्रवर्ती, देवेन भोजानी, प्रथमेश परब, महेश मांजरेकर, अतिशा नाईक, विजय निकम आणि इतर कलाकरांनी काम केलं आहे. आता अनेकजण या वेब सीरीजच्या सीझन 2ची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. विक्रांत मॅसीनं आयपीएस मनोज शर्मासोबत शेअर केला फिल्मफेअर अवॉर्ड
  2. धनुषचे तिरुपतीच्या रस्त्यावर शूटिंग, बघ्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडी
  3. 'वॉर 2' च्या शूटिंगला होणार सुरुवात, हृतिक रोशनने दिली अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.