ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं दिलजीत दोसांझ आणि पिटबुलबरोबर टायटल ट्रॅकसाठी दिलं योगदान, पोस्ट व्हायरल - BHOOL BHULAIYAA 3 TITLE TRACK

कार्तिक आर्यननं दिलजीत दोसांझ आणि अमेरिकन गायक पिटबुलबरोबर धमाकेदार टायटल ट्रॅकसाठी योगदान दिलंय. कार्तिकनं आपल्या सोशल मीडियावर गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

Bhool Bhulaiyaa 3
भूल भुलैया 3 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 15, 2024, 2:13 PM IST

मुंबई - 'भूल भुलैया 3' पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. दरम्यान 15 ऑक्टोबर रोजी, कार्तिक आर्यननं इंस्टाग्रामवर 'भूल भुलैया 3'च्या टायटल ट्रॅकचा टीझर शेअर केला आहे. हा ट्रॅक खूप धमाकेदार असणार आहे. दरम्यान कार्तिक आर्यन, दिलजीत दोसांझ आणि आंतरराष्ट्रीय संगीत आयकॉन पिटबुल हे आता या ट्रॅकद्वारे धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागतिक मंचावर आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारा दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा आपल्या आवाजानं चाहत्यावर जादू करणार आहे.

'भूल भुलैया 3'मधील आगामी गाणं : 'भूल भुलैया 3'च्या टायटल ट्रॅक 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा टीझरमध्ये करण्यात आली आहे. या गाण्याचा टीझर शेअर करताना कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दिलजीत एक्स (X) पिटबुल आणि ओजी नीरज या सर्वोत्कृष्ट कोलॅबसह रूह बाबा जागतिक पातळीवर जातोय.' भूल भुलैया 3' च्या भयानक स्लाईडसाठी सज्ज व्हा.' शेअर केलेल्या टीझरमध्ये कार्तिकचे धमाकेदार डान्स मूव्ह दिसत आहेत. टीझरमधील कार्तिकचा डान्स हा चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. सध्या या टायटल ट्रॅकची छोटी झलक दिसल्यानं अनेकजण या गाण्याबद्दल सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

'भूल भुलैया 3' कधी होणार रिलीज : दरम्यान पिटबुलबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं यापूर्वी देखील भारतीय गाण्यासाठी योगदान दिलं होतं. गुरू रंधावाबरोबर टी-सीरीज आणि ट्रॅक 'स्लोली स्लोली'साठी त्यानं योगदान दिलं होतं. हे गाणं खूप गाजलं होतं. दुसरीकडे दिलजीत यावर्षी अनेक हिट ट्रॅकमध्ये दिसला. त्यानं 'क्रू'मधील ट्रॅक 'नैना'साठी आणि 'कल्की एडी 2898'मधील 'भैरव' गाण्यासाठी आवाज दिला आहे. सध्या दिलजीत खरोखरच जागतिक पातळीवर खळबळ निर्माण करत आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'भूल भुलैया 3' चं टॉप सिक्रेट : क्लायमॅक्समध्ये काय दडलंय कलाकारांसह टीमलाही नाही पत्ता
  2. 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरनं रचला इतिहास, व्ह्यूजच्या बाबतीत 'सिंघम अगेन'लाही टाकलं मागं
  3. पुन्हा एकदा मंजुलिकाची दहशत सुरु, 'भूल भुलैया 3'चा टीझर प्रदर्शित - bhool bhulaiyaa 3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.