मुंबई - अभिनेता अनुपम खेर अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडीओ शेअर करत असतो. यात शेअर होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यामातून तो जीवनाच्या सर्व स्तरातील व्यक्तींबरोबर केलेल्या विविध भेटींचे प्रदर्शन करत असतो. गुरुवारी रस्त्याच्या कडेला कंगवा विकणाऱ्या एका विक्रेत्याशी त्याचा फार गंमतशीर संवाद झाला. मला कंगव्याची गरज नाही असे सांगून अनुपमने विनोदाने स्वतःची खिल्ली उडवली, पण विक्रेत्याचा वाढदिवस असल्याने त्यानं कंगवा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकत अनुपमने कॅप्शनमध्ये लिहिले, "बाल्ड ब्युटिफुल!! मुंबईतील मजेदार सामना: राजू मुंबईच्या रस्त्यावर कंगवा विकतो! माझ्याकडे कंगवा विकत घेण्याचं खास कारण नाही. पण तो त्या राजूचा वाढदिवस होता. आणि त्याला वाटले की मी कंगवा विकत घेतला तर ही त्याच्यासाठी चांगली सुरुवात असेल. मला खात्री होती की त्यानं आयुष्यातील चांगले दिवस पाहिले आहेत. त्याचे हास्य मला प्रेरणादायी वाटलं. तुम्ही त्याला कधी पाहिले तर कृपया त्याच्याकडून कंगवा विकत घ्या.. तुम्हाला केस असो वा नसो! तो आपल्या साध्या व्यक्तिमत्त्वाने तुमचा दिवस उजळेल!"
अनुपम खेरनं कंगव्यासाठी राजूला ४०० रुपये दिले. यामुळे विक्रेत्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कंगवा विकत घेण्यास अनुपमला सुरुवातीला संकोच वाटला तरीही विक्रेत्याने त्यासाठी आग्रह धरला. तो म्हणाला की त्यांनी जर कंगवा खरेदी केला तर तर तो दिवसभर आणखी विकण्यासाठी त्याला आत्मविश्वास मिळेल. राजूने अनुपमला आपला प्रवासही सांगितला. तो कंगवा विकण्यासाठी वांद्र्याहून अधेरीपर्यंत चालत आला होता.
व्हिडिओला प्रतिसाद देताना एका चाहत्याने कमेंट केली की, "अनुपम सर तुमची ही बाजू खूप प्रेरणादायी आहे." दुसऱ्याने लिहिले, "किती महान व्यक्ती आहात तुम्ही सर." आणखी एकाने कमेंट केली, "तुमच्या साध्या विचारामुळे त्याचा दिवस बनला आणि त्याला हसायला मिळालं."
अनुपमच्या आगामी कामाचा विचार करता तो 'कुछ खट्टा हो जाए'मध्ये दिसणार आहे. हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजन असलेल्या या चित्रपटात त्याच्यासह गुरू रंधावा, सई मांजरेकर, इला अरुण आणि दिग्गज तेलुगू विनोदी अभिनेता ब्रह्मानंदम काम करत आहेत. मच फिल्म्स आणि अमित भाटिया निर्मित हा चित्रपट 16 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -