ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर प्रदर्शित - बडे मियाँ और छोटे मियाँचा टीझर

Bade Miyan Chote Miyan's teaser out : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर एका मिशनवर जाताना दिसतील.

Bade Miyan Chote Miyans teaser out
बडे मियाँ और छोटे मियाँ टीझर आऊट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 1:03 PM IST

मुंबई - Bade Miyan Chote Miyan's teaser out : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ और छोटे मियाँ' चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. दरम्यान आज 24 जानेवारीला सकाळी 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. 'बडे मियाँ और छोटे मियाँ 'च्या टीझर हा अ‍ॅक्शननं भरलेला आहे. या टीझरमध्ये धोकादायक स्टंट आहे. या चित्रपटाचा टीझर हा 1.38 मिनिटांचा आहे. हा देशभक्तीवर बेतलेला मसाला चित्रपट असणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बडे मियाँ छोटे मियाँ' टीझर रिलीज : 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचा टीझर सुरुवातीपासून शेवटपर्यंत धमाका करणारा आहे. पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अक्षय आणि टायगरची जोडी धमाल करण्यासाठी येत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनची झलक पाहिला मिळते. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुकुमारन व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, आलिया इब्राहिम, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, रोफिक खान, जुगल हंसराज, रोनित रॉय आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं प्रमोशन अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे जोरदार करताना दिसत आहेत. या चित्रपटाकडून अक्षय आणि टायगरला खूप अपेक्षा आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल : 23 जानेवारीला 'बडे मियाँ छोटे मियाँ' या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या टीझर हा कधी रिलीज होणार हे सांगणारं एक पोस्टर रिलीज करत सांगण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये अक्षय-टायगर डॅशिंग दिसत होते. पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अक्षय आणि टायगरबरोबरच साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अक्षय पुढं 'स्काई फोर्स'मध्ये सारा अली खानसोबत असणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम 3'मध्ये असेल. दुसरीकडे टायगर हा 'सिंघम 3', 'मिशन ईगल', 'रॅम्बो' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ऑस्कर नामांकनात निशा पाहुजा दिग्दर्शित 'टू किल अ टायगर' झाली एंट्री
  2. सारा अली खाननं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट; पाहा फोटो
  3. ऑस्कर 2024, 'ओपेनहायमर' 13 नामांकनांसह आघाडीवर; वाचा संपूर्ण यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.