मुंबई - Bade Miyan Chote Miyan New Release Date: बहुप्रतीक्षित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटांबद्दल एक अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट ही ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या यूएईमध्ये चित्रपटाचे प्रमोशनसाठी आहेत. गेल्या सोमवारी, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयनं लिहिलं होतं, 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना ईदच्या अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा. 'बडे मियाँ छोटे मियाँ' ईदच्या दिवशी तुमच्या संपूर्ण कुटुंबासह पाहा, आता 11 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.''
'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या टीमनं रिलीज तारखेसाठी नवीन पोस्टर जारी केलं आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची शुटिंग मुंबई, लंडन, अबू धाबी, स्कॉटलंड आणि जॉर्डन यासारख्या ठिकाणी झाली आहे. या चित्रपटातील हॉलीवूड शैलीतील सिनेमॅटिक दृश्य खूप चर्चेत आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर व्यतिरिक्त साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, आलिया इब्राहिम, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, जुगल हंसराज आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
वर्कफ्रंट : 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट सुरुवातीला 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. याचं दिवशी अजय देवगण स्टारर 'मैदान' चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. दरम्यान 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटाचा रनटाईम हा 2 तास 44 मिनिटांचा आहे. दरम्यान या जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय 'स्कायफोर्स' , 'वेलकम टू द जंगल', 'हाऊसफुल्ल 5', 'खेल खेल में', 'हेराफेरी 3','राउडी राठोड 2'आणि 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय टायगर हा 'सिंघम अगेन' आणि 'रॅम्बो' चित्रपटांमध्ये दिसेल.
हेही वाचा :
- 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training
- नयनतारानं नवीन ऑफिसचे फोटो शेअर करत टीमचे मानले आभार - Nayanthara
- संदीप रेड्डी वंगा रेड्डीचं भाकित, "प्रभास स्टारर स्पिरिटची पहिल्या दिवशी कमाई होईल 150 कोटी" - Sandeep Reddy Vanga