मुंबई - Bad Newz Box Office : अभिनेता विकी कौशल, एम्मी विर्क आणि तृप्ती डिमरी स्टारर रोमँटिक कॉमेडी ड्रामा 'बॅड न्यूज' 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'बॅड न्यूज'नं बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे. अंदाजे 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अडीच हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. 'बॅड न्यूज'मधील गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटांच्या गाण्यावर अनेकजण आता सोशल मीडियावर रिल्स बनवत आहे. 'बॅड न्यूज'नं रुपेरी पडद्यावर चांगली ओपनिंग केल्यानंतर हा चित्रपट येणाऱ्या दिवसात खूप कमाई करेल अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. दरम्यान 'बॅड न्यूज'नं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याबद्दल जाणून घेऊया...
'बॅड न्यूज' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'बॅड न्यूज' चित्रपटाचा चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात 'ॲनिमल स्टार तृप्ती डिमरीचा अभिनय अनेकांना आवडला आहे. हिंदी पट्ट्यातील चित्रपटगृहांमध्ये 22 टक्क्यांहून अधिक ऑक्युपन्सी रेट बॅड न्यूजसाठी नोंदवला गेला आहे. 12 जुलैला अक्षय कुमारचा 'सरफिरा' आणि साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा चित्रपट 'इंडियन 2' प्रदर्शित झाला. सॅकनिल्क रिपोर्ट्सनुसार, 'बॅड न्यूज' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट विकी कौशलच्या फिल्मी करिअरमधील सर्वात मोठा कमाई करणारा चित्रपट ठरेल असं सध्या दिसत आहे. करण जोहर, अपूर्व मेहता, अमृतपाल सिंह बिंद्रा यांनी 'बॅड न्यूज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनला गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलंय.
सर्वात मोठी ओपनिंग घेणाऱ्या विकी कौशलच्या चित्रपटांची यादी
उरी - सर्जिकल स्ट्राइक (2019) - 8.25 कोटी
सॅम बहादूर (२०२३) – 6.25 कोटी
जरा हटके जरा बचके (2023) – 5.49 कोटी
भूत: द हॉन्टेड शिप (2020) – 5.10 कोटी रुपये
द ग्रेट इंडियन फॅमिली (2023) – 1.40 कोटी
हेही वाचा :
- 'बॅड न्यूज' ठरतोय नॉन-स्टॉप एंटरटेनमेंट, विकी कौशलच्या परफॉर्मन्सवर नेटिझन्स फिदा - Bad Newz X Review
- दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे : तृप्ती डिमरी! - Tripti Dimri Exclusive Interview
- कतरिना कैफ गरोदर असल्याच्या 'गुड न्यूज'मध्ये तथ्य नाही, 'बॅड न्यूज' प्रमोशनमध्ये विकी कौशलचा खुलासा - Katrina Kaif pregnant rumor