मुंबई - Bad Newz : विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एम्मी विर्क स्टारर रोमँटिक कॉमेडी ड्रामा 'बॅड न्यूज' या आठवड्यात 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय चित्रपटाची आगाऊ बुकिंगही आता सुरू झालं आहे. या चित्रपटामधील सीन्सवर आता सेन्सॉर बोर्डानं कात्री लावली आहे. 'बॅड न्यूज' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग सुरू झालं आहे. सॅकनिल्क अहवालानुसार, 'बॅड न्यूज'नं पहिल्या दिवशी दुपारपर्यंतच्या आगाऊ बुकिंगमध्ये 2,544 शोसाठी 15,488 तिकिटे विकून 44,54,832 रुपये कमावले आहेत.
'बॅड न्यूज'ची आगाऊ बुकिंग : 'बॅड न्यूज'नं अक्षय कुमार आणि राधिका मदानचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सरफिरा' चित्रपटाला 24 तासांत 12.8 हजार तिकिटे विकून 39.94 लाखांची कमाई करून मागे टाकले आहे. 'सरफिरा'नं पहिल्या दिवशी 24 तासांत सुमारे 11 हजार तिकिटांची विक्री करून 22.4 लाख रुपये कमवले होते. 'बॅड न्यूज'ची लोकप्रियता लक्षात घेता, हा चित्रपट दुहेरी अंकात आपले खाते उघडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 'बॅड न्यूज'नं पहिल्या दिवशी 10 ते 11 कोटी रुपये आणि पहिल्या वीकेंडला कमाई करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर 'बॅड न्यूज'नं 10 ते 11 कोटींची ओपनिंग केली तर हा चित्रपट विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरेल.
'बॅड न्यूज'मधून काही सीन कापण्यात आले : 'बॅड न्यूज' चित्रपटात कॉमेडीच नाही तर बोल्ड-रोमँटिक सीन्स आहे. यापैकी सेन्सॉर बोर्डानं विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्यातील तीन किसिंग सीन कापले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे सीन 8, 9, 10 सेकंदांची आहेत. याशिवाय सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनमधून दारूविरोधी दिलेल्या डिस्क्लेमरचा फॉन्ट मोठा करण्याचे आदेश दिले आहेत. सेन्सॉर बोर्डान' बॅड न्यूज'ला यूए ( U/A) प्रमाणपत्र दिलं आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलंय. या चित्रपटाचे निर्माते करण जोहर, अमृतल सिंग बिंद्रा आणि अपूर्व मेहता आहेत. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनवला आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
विकी कौशलचे सर्वात मोठे ओपनिंग चित्रपट
उरी - सर्जिकल स्ट्राइक (2019) - 8.25 कोटी
सॅम बहादूर (२०२३) – ६.२५ कोटी
जरा हटके जरा बचके (2023) 5.49 कोटी
भूत: द हॉन्टेड शिप (2020) 5.10 कोटी रुपये
द ग्रेट इंडियन फॅमिली (2023) 1.40 कोटी