मुंबई - Ayushamann Khurrana: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानानं सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2' या चित्रपटातून माघार घेतल्याचं समजत आहे. अलीकडेच आयुष्माननेही डेट क्लॅशमुळे करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट करण्यास नकार दिला होता. रिपोर्ट्सनुसार, तो सनी देओलच्या मोस्ट अवेटेड 'बॉर्डर 2' चा भाग असणार नाही. आयुष्मान या चित्रपटात भारतीय जवानाची भूमिका साकारणार होता. आता सोशल मीडियावर तो या चित्रपटात नसल्याच्या बातम्या खूप वेगानं पसरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आयुष्मानला या चित्रपटामधील आपली भूमिका ही फारशी आवडली नव्हती.
'बॉर्डर 2' आयुष्मान खुरानानं नाकारला : या चित्रपटात सनी देओल आधीच मुख्य भूमिकेत असल्यानं आयुष्मान स्वतःच्या स्क्रीन टाइम आणि भूमिकेबाबत कन्फ्यूज होता. या कारणामुळे त्यानं ही भूमिका नाकारली आहे. आता या चित्रपटाचं शूटिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटामध्ये पुन्हा एकदा सनी देओलचा जुना अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान 1997 मध्ये रिलीज झालेला 'बॉर्डर' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात सनी देओलनं मेजर कुलदीप सिंग चंदुरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील गाणी त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती.
'बॉर्डर 2' चित्रपटाबद्दल : 'बॉर्डर 2'चं दिग्दर्शन अनुराग सिंह करणार आहेत. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला सनी देओलनं एका पॉडकास्टमध्ये 'बॉर्डर 2'बद्दल सांगितलं होत की, "आम्ही 2015 मध्ये हा चित्रपट सुरू करणार होतो, मात्र नंतर माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानं, निर्माते 'बॉर्डर 2'ला बनवण्यास घाबरले. आता प्रत्येकाला हा चित्रपट बनवायचा आहे." दरम्यान आयुष्मान खुराना आतापर्यंत शेवटचा 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनन्या पांडे दिसली होती. आता पुढं तो 'बधाई हो 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'बधाई हो' चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर सान्या मल्होत्रा, गजराज राव, नीना गुप्ता यांसारखे कलाकार दिसले होते.
हेही वाचा :
- आयुष्मान खुरानानं करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट नाकारला, आलं कारण समोर - Ayushmann and Meghna Gulzar
- 'ड्रीम गर्ल'नंतर आयुष्मान खुराना पुन्हा एकदा राज शांडिल्यबरोबर करणार कॉमेडी, आगामी चित्रपटासाठी सज्ज - Ayushmann Khurrana upcoming movie
- आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी येणार एकत्र - VAMPIRES OF VIJAY NAGAR