ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुरानानं आघाडीच्या म्युझिक कंपनीशी जागतिक रेकॉर्डिंग करारावर केली स्वाक्षरी - ayushmann khurrana - AYUSHMANN KHURRANA

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानानं म्युझिक लेबलबरोबर जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. आता तो पुन्हा एकदा त्याच्या आवाजाची जादू दाखवताना दिसणार आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:23 PM IST

मुंबई - Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुराना वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'विकी डोनर' या चित्रपटातून त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आतापर्यत आयुष्माननं अनेक चित्रपट हिट दिले आहेत. 2023 मध्ये त्याचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. आता आयुष्मान अभिनय बाजूला ठेवून आपल्या संगीत कारकिर्दीत पुढे जाणार असल्याचं समजत आहे. पुन्हा एकदा तो आपल्या आवाजाची जादू चाहत्यांवर पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच आयुष्मान खुरानानं वॉर्नर म्युझिक इंडिया या देशातील आघाडीच्या म्युझिक लेबलबरोबर जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानं जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

म्युझिक वॉर्नर इंडियाबरोबर करार : या मोठ्या म्युझिक कंपनीबरोबर करार केल्यानंतर आयुष्मान खुराना म्हटलं होत की, ''मी माझे पुढचं गाणं लोकांसमोर सादर करण्यास उत्सुक आहे.'' अभिनयाबरोबरच आयुष्माननं संगीत विश्वातही खूप नाव कमावलं आहे. त्यानं 'नज्म नज्म', 'सादी गली आजा', 'पानी दा रंग' अशी अनेक हिट गाणी दिली आहेत. आयुष्मानची गाणी अनेकांनी खूप पसंत केली आहेत. आता आयुष्मानचे चाहतेही त्याच्या या कामगिरीमुळे खूप खूश आहेत. आयुष्मान त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिल्या गेलं आहे, ''आयुष्मान खुरानानं वॉर्नर म्युझिक इंडिया या देशातील आघाडीच्या म्युझिक लेबलबरोबर जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे त्याचा आवाज जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.''

आयुष्मान वर्कफ्रंट : तसेच आयुष्मान खुरानानं एका संवादादरम्यान म्हटलं होत की, ''मला नेहमी अशा लोकांबरोबर काम करायचे आहे जे काहीतरी नवीन करण्याचा विचार करतात. मला माझे संगीत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहे. मला विश्वास आहे की वॉर्नर म्युझिक इंडियाच्या सहाय्यानं मी या क्षेत्रात काहीतरी चांगलं करू शकेन. माझे पुढचे गाणं लोकांसमोर मांडण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे काहीतरी नवीन असेल, जे कदाचित लोकांनी यापूर्वी कधीच ऐकले नसेल.'' दरम्यान आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'बधाई हो 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. केएल राहुल आणि अथिया शेट्टी खरोखरच होणार का पालक? सत्य आलं बाहेर... - ATHIYA SHETTY AND KL RAHUL
  2. 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - ajay devgan shaitaan
  3. अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.