ETV Bharat / entertainment

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आयुष्मान खुरानावर चाहत्यानं उडवले डॉलर, अभिनेत्यानं दिली अशी प्रतिक्रिया - US CONCERT

आयुष्मान खुरानाच्या कॉन्सर्ट दरम्यान, एका चाहत्यानं त्याच्यावर डॉलर्स फेकले. यानंतर त्यानं असा काही सल्ला दिला, ज्यामुळे त्याचे कौतुक सोशल मीडियावर केले जात आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना (आयुष्मान खुराना (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 4:37 PM IST

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या बँडबरोबर अमेरिकन म्युझिक कॉन्सर्टवर आहे. शिकागो, न्यूयॉर्क आणि सॅन जोस सारख्या शहरांमध्ये त्याच्या अभिनयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच त्याच्या अमेरिकन कॉन्सर्टमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. आयुष्मानच्या कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्यांनी त्याच्यावर डॉलर्स फेकले. यानंतर आयुष्माननं यावर दिलेली प्रतिक्रिया ही मन जिंकणारी आहे. आता त्याचे सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.

डॉलर फेकल्यावर आयुष्माननं दिली 'ही' प्रतिक्रिया : आयुष्मानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका कॉन्सर्टमध्ये गात असताना, मध्येच एक चाहता त्याच्यावर डॉलर्सचा वर्षाव करतो. यावेळी आयुष्मान त्याचे प्रसिद्ध गाणे' पाणी दा रंग' म्हणत होता. त्यानंतर आयुष्माननं लगेच त्याचं गाणे थांबवले आणि चाहत्याला म्हटलं, "पाजी, हे करू नका. तुम्ही हे दान करू शकता, असं करू नका. या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, खुलेपणानं दान करा, कोणालाही न दाखवता. मी त्याचे काय करणार?' हे दृश्य पाहून तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आयुष्मानचे कौतुक केले.

चाहत्यांनी केलं आयुष्मानचे कौतुक : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते आयुष्मानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान त्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा आगामी चित्रपट 'थामा' 'स्त्री 2' चे निर्माते दिनेश विजन हे निर्मित करत आहेत. ही एक हॉरर-कॉमेडी आणि प्रेमकहाणी असेल, ज्यात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आयुष्मान खुरानाबरोबर दिसणार आहे. यात परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे. याआधी त्यांनी 'मुंज्या' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 2025च्या दिवाळीला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा आयुष्मानचा जबरदस्त अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हॉरर कॉमेडी 'थामा' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज...
  2. आयुष्मान खुरानाला पत्नी ताहिरा कश्यपनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - ayushmann khurrana birthday
  3. कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी आयुष्मान खुरानानं ऐकवली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ - Murder Case Ayushmann Khurrana

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.