ETV Bharat / entertainment

आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना भावंडांचा धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल - NATIONAL SIBLINGS DAY 2024 - NATIONAL SIBLINGS DAY 2024

National Siblings Day 2024 : आज नॅशनल सिबलिंग्स डे आहे आणि या प्रसंगी अभिनेता आयुष्मान खुरानानं आपल्या धाकटा भाऊ अपारशक्ती खुरानाबरोबर डान्स करून सर्वांना थक्क केलं आहे.

National Siblings Day 2024
नेशनल सिबलिंग्स डे 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 4:57 PM IST

मुंबई- National Siblings Day 2024 : नॅशनल सिबलिंग्स डे हा खूप विशेष दिवस आहे, दरवर्षी 10 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. मदर्स डे आणि फादर्स डे यासारख्या खास दिवसांप्रमाणेच नॅशनल सिबलिंग्स डे अनेकजण मोठ्या थाटात साजरा करतात. या दिवशी, तुम्ही आणि लहान, मोठ्या बंधू आणि बहिणींवर प्रेम व्यक्त करू शकता. हा दिवस अनेक बॉलिवूड स्टार्स मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानानं नॅशनल सिबलिंग्स डेनिमित्त एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याचा मोठा भाऊ आयुष्मान खुरानाबरोबर नाचताना दिसत आहे.

अपारशक्ती खुराना आणि आयुष्मान खुराना : अपारशक्ती खुरानानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ पाहण्यासारखा आहे. नॅशनल सिबलिंग्स डेनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो त्याच्या भावाबरोबर 'काल तेरी छोटी' गाण्यावर डान्स करत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. आयुष्मान आणि अपारशक्ती जेव्हा डान्स करतात, त्यांचा डान्स पाहण्यासाठी लहान मुले देखील तिथे बसलेली असतात. हा व्हिडीओ पाहून कुणालाही हसायला येऊ शकतं. अपारशक्तीनं व्हिडिओ शेअर करत या पोस्टवर लिहिलं, ''होय, हे नेहमीच वेड्यांचं घर राहिले आहे. नेशनल सिबलिंग्स डेच्या शुभेच्छा.''

चाहते आणि सेलिब्रिटींनी केला कमेंट्सचा पाऊस : अभिनेत्री प्रनूतननं आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना यांच्या या मजेदार व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आहेत. कोरिओग्राफर शक्ती मोहननं या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आहेत. याशिवाय कोणी या व्हिडिओवर लाईक बटण दाबले आहेत.आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आयुष्मान शेवटी 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता पुढं तो 'बधाई हो 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे अपारशक्ती हा 'स्त्री 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. नॅशनल सिबलिंग डेच्या प्रसंगी जाणून घ्या बॉलिवूडमधील काही सुंदर भावंडाच्या जोडीबद्दल - Siblings Day 2024
  2. वरुण धवन आणि तापसी पन्नू यांनी सांगितलं त्याच्या आयुष्यातील भावंडाचं महत्त्व - National Siblings Day
  3. बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएबरोबरच्या खासगी लग्नाबद्दल तापसी पन्नूनं केला खुलासा - taapsee pannu and wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.