ETV Bharat / entertainment

करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN - AYUSHMANN AND SARA ALI KHAN

Ayushmann Khurrana And Sara Ali Khan : आयुष्मान खुराना आणि सारा अली खानची जोडी आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहिला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करण जोहर लवकरच करणार आहे.

Ayushmann Khurrana And Sara Ali Khan
आयुष्मान खुराना आणि सारा अली खान (आयुष्मान-सारा (Ayushmann Khurrana And Sara Ali khan - Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 6:25 PM IST

मुंबई - Ayushmann Khurrana And Sara Ali Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आता चित्रपटसृष्टीला एक नवीन जोडी देणार आहे. करण जोहर हा आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांना एका चित्रपटासाठी एकत्र आणत आहेत. आयुष्मान आणि सारा अभिनीत या ॲक्शन कॉमेडी चित्रपटासाठी करण जोहरनं सिखिया एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाची लवकरच घोषणा होणार आहे. आता ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

सारा अली खान आणि आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट : आयुष्मान खुराना आणि सारा अली खान स्टारर या शीर्षकहीन ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आकाश कौशिक यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. करण जोहर आणि सिखिया एन्टरटेन्मेंटचा हा तिसरा चित्रपट आहे. आयुष्मान आणि सारा अली खान हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आयुष्मान खुरानाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो सनी देओलबरोबर 'बॉर्डर 2' या चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू होईल. जेपी दत्ता आणि भूषण कुमार संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

आयुष्मान खुराना आणि सारा अली खानचे आगामी चित्रपट : 'बॉर्डर 2' हा चित्रपट 2015 मध्ये बनवण्याचा प्लॅन होता, मात्र सनी देओलचा बॉक्स ऑफिसवरचा आलेख घसरल्यानं हा चित्रपट रखडला होता. आता हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तसेच आयुष्मान खुराना शेवटी 'ड्रीम गर्ल 2'मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट 24 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता पुढं तो 'विकी विद्या का वो वाला व्हिडियो'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे सारा अली खान 'मेट्रो इन दिनो'मध्ये आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे. तिचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. याशिवाय ती 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमारबरोबर झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. मिसेस माही जान्हवी कपूरचं क्रिकेट बॉल हॅन्ड बॅगमधील क्लीन बोल्ड लूक व्हायरल - mrs mahi janhvi kapoor
  2. 'या' कारणामुळे संजय दत्तनं 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातून घेतली माघार - sanjay dutt exits from welcome 3
  3. विक्रांत मॅसी स्टारर 'ब्लॅकआउट' टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ... - Vikrant massey and mouni roy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.