ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हॉरर कॉमेडी 'थामा' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज... - RASHMIKA MANDANNA

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'थामा' चित्रपट हा 2025च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

ayushmann khurrana and rashmika mandanna
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना (थामा (Tease Screen Grab))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 30, 2024, 1:43 PM IST

मुंबई : 'स्त्री 2'चे निर्माते दिनेश विजन यांनी 30 ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी आज मोठी एक बातमी दिली आहे. माडोक फिल्म्सचे मालक दिनेश विजन यांनी त्यांचा नवीन हॉरर-कॉमेडी लव्हस्टोरी रिलीज करण्याची घोषणा केली आहे. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 'थामा' या चित्रपटात आयुष्मान खुरानाबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चालू वर्षी बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' आणि 'मुंज्या' चित्रपटांनी धमाकेदार कमाई केली होती. आता दिवाळी 2025ला बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाल होताना दिसेल. आता या चित्रपटाबद्दल अनेकजण उत्सुक आहेत.

हॉरर-कॉमेडी 'थामा' चित्रपट : आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त 'थामा'मध्ये परेश राव आणि नवाजुद्दीन सिद्दीकी देखील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'थामा'ची घोषणा करताना टीझर शेअर करून या चित्रपटाची स्टारकास्ट देखील समोर आली आहे. एक हॉरर-कॉमेडी असण्याबरोबर 'थामा' हा चित्रपट एका भितीदायक प्रेमकथा असेल.'थामा' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे. यापूर्वी त्यांनी 'मुंज्या' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाची कहाणी निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे. दरम्यान दिनेश विजन यांचा 'स्त्री 2' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'थामा' चित्रपटसाठी चाहते उत्सुक : 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर देशांतर्गत 600 कोटींहून अधिक कमाई करून शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण' या हिंदीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे. याशिवाय आता या दिवाळीमध्ये आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' देखील प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान 'थामा' चित्रपटाच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'हे दिवाळीसाठी खूप मोठं गिफ्ट असणार आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मी या चित्रपटाच्या रिलीजची आता वाट पाहात राहणार आहे.' आणखी एकानं लिहिलं,' लवकर रिलीज करा पैसे जास्त देऊ.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्ना सायबर क्राईमची झाली ब्रँड ॲम्बेसेडर, डीपफेक व्हिडिओमुळे आली चर्चेत....
  2. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांनी 200 बॅकग्राउंड डान्सर्ससह 'सिकंदर'मधील गाण्याचं केलं शूट - Salman Khan And Rashmika Mandanna
  3. रश्मिका मंदान्नाचा अपघात: पोस्ट शेयर करुन चाहत्यांना दिली कल्पना, पोस्ट झाली व्हायरल - Rashmika Mandanna share post

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.