मुंबई - बहुप्रतीक्षित सिक्वेल 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा मोठा प्रभाव दिसून आला. चाहते आणि समीक्षक यांनी सिनेमा पाहून आपली मतं 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर व्यक्त केली आहेत.
#OneWordReview...#Pushpa2: MEGA-BLOCKBUSTER.
— taran adarsh (@taran_adarsh) December 4, 2024
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️½
Wildfire entertainer... Solid film in all respects... Reserve all the awards for #AlluArjun, he is beyond fantastic... #Sukumar is a magician... The #Boxoffice Typhoon has arrived. #Pushpa2Review#Sukumar knows well… pic.twitter.com/tqYIdBaPjq
चित्रपटाचे दिग्दर्शन, अॅक्शन, अभिनय आणि संकलनाची लोक प्रशंसा करत आहेत. सुकुमार दिग्दर्शित, या चित्रपटात लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या साहसी तरुणाची कथा पुढं सुरू ठेवली आहे. यावेळी पुष्पा राजची लढाई एसपी बनवर सिंग शेकावत (फहद फासिल) याच्याशी आहे.
Pushpa 2 is a blockbuster! 🔥 Allu Arjun slays it! #PushpaTheRule #Pushpa2 #Pushpa2Celebrations #WildFirePushpa #AlluArjun #Pushpa2Review #BhAAI #ntr #prabhas #chiranjeevi #nani #WildFirePushpa " #msdhoni#applemusic #TaylorSwift #Blockbuster
— Saikiran (@Saikira49611788) December 5, 2024
सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशन मटेरिलमधून दिसलेली थरारक अॅक्शन, गाणी, संवाद आणि कसलेल्या कलाकारांचा फौज यामुळे सुरुवातीपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात सकारात्मकता होती. फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार देऊन प्रशंसा केली. त्यांनी 'पुष्पा 2' 'मेगा-ब्लॉकबस्टर' असल्याचं म्हटलंय. त्यांनी दिग्दर्शकाचंही कौतुक केलंय. अल्लू अर्जुनच्या भूमिकेलाही त्यांनी खास अधोरेखित केलं आहे.
X वरील अनेक चाहत्यांनी या चित्रपटचं स्मरण पुढील दशकभर होत राहिल असं म्हटलंय. अल्लू अर्जुनला प्रेक्षकांनी 'गॉड लेव्हल परफॉर्मर' म्हटलं आहे आणि असा अंदाज लावला आहे की हा अभिनेता दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याच्या मार्गावर आहे.
#Pushpa2 1st Half good one! 👍
— 🌜Devathai🌛 (@devathai0) December 5, 2024
The film picks up right where Part 1 ends. Feels a little lengthy at times and runs purely on drama but Sukumar has done a decent job in packaging this properly in a commercial way.. #Pushpa2Review#Pushpa2Celebrations https://t.co/7TtXi4O51m
आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे चित्रपटाचा अविश्वसनीय वेग. चित्रपटाचा बराच काळ रनटाइम असूनही, कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी पकड घेते याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर देखील 'पुष्पा 2' ला 'वाइल्डफायर ब्लॉकबस्टर' म्हटलंय, तर काहींना हा चित्रपट 'सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केलाय.
It seems #Pushpa2 will break all the records of films this time and create a different record#Pushpa2 #Pushpa2TheRuleOnDec5th #Pushpa2Celebrations #Pushpa2TheRulereview #Pushpa2Review #AlluArjun #Alluarjunarmy #RashmikaMandanna #fdfswithfilmymantra#rashmikamandannanavel pic.twitter.com/4eIQYqtpWv
— Ownworld💌 (@Er_rajgalsar) December 5, 2024
आणखी एका युजरनं अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं, क्लायमॅक्स फाईटचं कौतुक करत हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला पाहिजे असं म्हटलंय. अलीकडच्या काळातील हा सर्वोत्तम व्यावसायिक चित्रपट असल्याचंही म्हटलंय.
#Pushpa2TheRule First Half: Entertainer. Allu Arjun show all the way. Allu Arjun and Fahadh are terrific. Unmatched.
— Nishit Shaw (@NishitShawHere) December 5, 2024
Few scenes seem overdone but as the film brings you to the main conflict towards the interval, it becomes interesting.
All eyes on the second half! 👍
अल्लू अर्जुनच्या धमाकेदार परफॉर्मन्स व्यतिरिक्त, चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, सुनील, अनसूया भारद्वाज, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'पुष्पा: द राईज'चा शेवट जिथे झाला तिथूनचा या चित्रपटाचं कथानक सुरू होतं.
#Pushpa2TheRule #Pushpa2Review
— mad max (@targariyan) December 5, 2024
the story is simple with so much of elevation and it worked very well 🫡🔥
allu arjun terrific performance 🥵🫡 climax fight is madness 🥵🥵 worth watching in theatre ❤️ best commercial in recent times 🙌🏻❤️👏🏻 https://t.co/7MKCoUgl7g
ऑनलाइन प्रतिक्रियांवरून, दिसतंय की 'पुष्पा 2: द रुल' हा नियमित सिक्वेलपेक्षा अधिक वेगळा आहे. अनेकांना हा चित्रपट अपेक्षेपेक्षाही जास्त आवडला आहे. सुकुमारचे दिग्दर्शन, अल्लू अर्जुनचा पॉवरहाऊस परफॉर्मन्स आणि चित्रपटातील आकर्षक कथाकथन यांचं चाहत्यांकडून चांगलेच कौतुक होत आहे.
Loading.. 2nd National Award for #AlluArjun @PushpaMovie #Pushpa2Review #Pushpa2TheRule #Pushpa2CarnivalFromTonight @SKNonline pic.twitter.com/J1o3Zh7Ts3
— The Kalyan Fans (@iamjanasenani) December 5, 2024
हेही वाचा -
हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी, 1 महिलेचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
पुन्हा धमकीनं हादरला 'भाईजान'; शूटींग चालू असताना फॅन म्हणाला 'लॉरेन्स बिश्नोईको बुलाऊ क्या'
अल्लू अर्जुन ठरणार पहिल्या दिवशी 270 कोटी कमावणारा पहिला अभिनेता, 'पुष्पा 2' रचणार कमाईचे नवे विक्रम