ETV Bharat / entertainment

दिल्लीत आई गौरी खानचं बालपण गेलेल्या घराची आर्यन खाननं केली खरेदी, इतक्या कोटीला झाली डील - Aryan Khan bought house - ARYAN KHAN BOUGHT HOUSE

Aryan Khan bought house :आर्यन खाननं दिल्लीतील एका इमारतीचे ते दोन मजले विकत घेतले आहेत. याच इमारतीत त्याची आई गौरी खानने तिच्या बालपणीचे काही खास क्षण घालवले होते आणि लग्नानंतर ती पती शाहरुख खानसोबत येथे राहिली होती.

Aryan Khan bought  house
आई गौरी खानसह आर्यन खान ((IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 8:03 PM IST

मुंबई - Aryan Khan bought house : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान यानं देशाची राजधानी दिल्लीतील पंचशील पार्क बिल्डिंगमध्ये दोन मजले खरेदी केले आहेत. या दोन्ही मजल्यांची किंमत काही कोटींमध्ये आहे. आर्यन खाननं जे मजले विकत घेतले आहेत ते काही साधेसुधे मजले नाहीत. तर, ही तीच इमारत आहे, ज्यामध्ये ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचे मालक त्याचे आई-वडील शाहरुख खान आणि गौरी खान आहेत. याच इमारतीत गौरी खानचे बालपण गेलं होतं आणि लग्नानंतरही गौरी खाननं पती शाहरुख खानबरोबर खास क्षण घालवले होते.

किती किंमतीला ठरला व्यवहार?

मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खाननं दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये हे दोन मजले 37 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या मजल्यांचा सौदा मे महिन्यात झाला आहे. आर्यन खानने या मजल्यांसाठी २.६४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे. हे दोन्ही मजले आर्यन खानची इंटेरिअर डिझायनर आई गौरी खाननं खरेदी केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचाही पंचशील पार्कमध्ये २७ हजार स्क्वेअर फुटांचा हेरिटेज व्हिला आहे. शाहरुख खाननं 2001 मध्ये ही प्रॉपर्टी 13 कोटी रुपयांना खरेदी केली होती. आज त्याची किंमत 200 कोटी रुपये आहे.

आर्यन खान सध्या काय करतो?

आर्यन खान सध्या चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याच्या स्टारडम पहिल्या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओलही दिसणार आहे. तर शाहरुख खानबद्दल बोलायचं झाले तर 2023 मध्ये 'किंग खान'ने 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता शाहरुख खान चित्रपट दिग्दर्शक सुजॉय घोषच्या 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सुहाना खान देखील दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.