मुंबई - Article 370 trailer OUT : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री यामी गौतम पुन्हा एकदा देशाच्या ज्वलंत प्रश्नावर चित्रपट घेऊन बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करत आहे. याआधी ती 'उरी - सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात दिसली होती आणि आता ती काश्मीरमधील विवादित कलम 370वर आधारित चित्रपटात दिसणार आहे. 'आर्टिकल 370' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 8 फेब्रुवारी रोजी, 'आर्टिकल 370' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'आर्टिकल 370'चा ट्रेलर रिलीज : 'आर्टिकल 370'च्या निर्मात्यांनी आज ट्रेलर रिलीज करून प्रपोज डेच्या दिवशी चाहत्यांनी एक भेट दिली आहे. झी स्टुडिओनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'आर्टिकल 370'चं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''एक ऐतिहासिक पाऊल. ज्यानं देश बदलवला. कलम 370 चा ट्रेलर रिलीज. 'आर्टिकल 370' 23 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.'' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संसदची झलक दिसत असून यामी गौतम आणि साऊथ अभिनेत्री प्रियामणि राज दिसत आहेत. याशिवाय पोस्टरमध्ये यामीच्या हातात मशीनगन आहे. 'आर्टिकल 370'चा ट्रेलर पाहून अनेकजण यामीला तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
कसा आहे ट्रेलर : यामी गौतम या चित्रपटातील एनआयए अधिकारी आहे, जिला काश्मीरमध्ये कलम 370 नंतर शांतता प्रस्थापित करण्याची आणि दहशतवाद्यांचे मिशन अयशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय या चित्रपटात 'रामायण' या टीव्ही मालिकेतील (राम) अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत कलम 370 लागू करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये पुलवामा हल्ला आणि काही दहशतवादी घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सर्व पात्र त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेत दिसत आहेत.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : या चित्रपटात यामी गौतम, अरुण गोविल, प्रियामणी, वैभव तत्ववादी, किरण कामराकर, राजा अर्जुन, स्कंदा ठाकूर, अश्विनी कौल हे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा :