ETV Bharat / entertainment

अर्शद वारसी आणि अक्षय कुमार राजस्थानमध्ये करणार 'जॉली एलएलबी 3'चं शूटिंग... - ARSHAD WARSI and akshay kumar - ARSHAD WARSI AND AKSHAY KUMAR

Jolly LLB 3 Shooting : 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. अर्शद वारसी आणि अक्षय कुमार हे राजस्थानमध्ये 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाचं शुटिंग करणार आहेत.

Jolly LLB 3 Shooting Starts
जॉली एलएलबी 3 शुटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:13 PM IST

मुंबई - Jolly LLB 3 Shooting : 'जॉली एलएलबी' आणि त्याचा सीक्वेल 'जॉली एलएलबी 2' या दोन्ही दमदार चित्रपटांनी कहाणी चाहत्यांना खूप आवडली होती. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक तिसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहेत. अक्षय आणि अर्शद वारसी ही धमाकेदार जोडी 'जॉली एलएलबी 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, अर्शद वारसी अक्षय कुमारबरोबर 'जॉली एलएलबी 3'चं शूटिंग सुरू करणार आहे. 'जॉली एलएलबी 3' शूटिंग लवकरच राजस्थानमध्ये सुरू होणार असून या चित्रपटामध्ये अक्षय आणि अर्शदची जोडी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करताना दिसणार आहेत. या चित्रपटात भरपूर कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन : 'जॉली एलएलबी 3'चे पहिले शूटिंग शेड्यूल राजस्थानमध्ये होणार आहे. आता राजस्थानमधील लोकेशनवर प्री-प्रॉडक्शन काम सुरू आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 'जॉली एलएलबी 3'मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिसऱ्या भागात दोन्ही जॉली आमनेसामने येणार आहेत. या चित्रपटामध्ये सौरभ शुक्ला पुन्हा एकदा न्यायाधीशाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जॉली एलएलबी 3' मध्ये कुठली अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल, याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वर्कफ्रंट : 'जॉली एलएलबी 3' संपूर्ण शुटिंग 2024 मध्ये केल्या जाणार जाईल आणि 2025 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊ शकतो. दरम्यान 'जॉली एलएलबी'चा सीक्वेल 'जॉली एलएलबी 2' हा देखील कॉमेडी होता. सुभाष कपूर दिग्दर्शित या दोन्ही भागात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांनी जगदीश त्यागीची भूमिका साकारली होती, ज्याला जॉली म्हणूनही ओळखले जाते. या चित्रपटामध्ये एका वकिलाचा संघर्ष दाखवण्यात आला होता. दरम्यान या जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय हा 'खेल खेल में', 'सरफिरा', 'स्काई फोर्स', 'वेलकम 3', 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय अर्शद हा 'वेलकम 3' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. 'कल्की एडी 2898'च्या निर्मात्यांनी शेअर केलं नवीन पोस्टर, आज होईल रिलीज तारखेची मोठी घोषणा - kalki 2898 ad
  2. 'तारक मेहता...' फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता, महत्त्वपूर्ण फुटेज पोलिसांच्या हाती - Gurucharan Singh Missing
  3. इलियाना डिक्रूझने दिली मायकेल डोलनशी लग्न केल्याची व एक मुलगाही असल्याची कबूली - Ileana Dcruz

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.