ETV Bharat / entertainment

अरबाज पटेलची कॅप्टन्सी धोक्यात, घरातील सदस्याच्या सोईसुविधांसाठी करणार त्याग? - Bigg Boss Marathi 5 - BIGG BOSS MARATHI 5

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो प्रेक्षकांना खूप पसंत पडला आहे. आता सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अरबाज पटेलची कॅप्टन्सी धोक्यात असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 21, 2024, 3:48 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टनपद खूप महत्त्वाचं मानलं जातं. कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असून त्याचा एक आठवड्याच्या नॉमिनेशनपासून देखील बचाव होतो. 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टन हा घरातील निर्णय घेत असतो. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सुरुवातीपासून दोन टीम तयार झाल्या आहेत. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील कॅप्टन्सीचा फायदा होत असतो. 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप रंजक होत आहे. या शोची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर झाली होती. यानंतर घरात एक टास्क झाला. यात अरबाज पटेल हा घराचा दुसरा कॅप्टन झाला.

अरबाज कॅप्टन्सी गमावणार? : दरम्यान 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये अरबाजच्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार असल्याचं दिसत आहे. या शोमध्ये आता अरबाज आपली कॅप्टन्सी गमावू शकतो. 'बिग बॉस' मराठीच्या नवीन प्रोमोत 'बिग बॉस' अरबाजला म्हणतो, "अरबाज बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स काही सोईसुविधा विकत घेऊ शकता, मात्र तुला त्याबदल्यात आपलं कॅप्टन्सी गमवावं लागेल. आता तुला तुझा किंवा घराचा फायदा निवडायचा आहे, याबद्दल ठरव. 'बिग बॉस'नं ही गोष्ट म्हटल्यानंतर घरातील सदस्य हे आश्चर्यचकित होतात. आता अरबाज यावेळी काय करणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

टीम 'ए'ला बसेल फटका : अरबाजची कॅप्टन्सी गेल्यानंतर टीम 'ए' ला खूप मोठा झटका बसणार आहे. आता नक्की आणि अरबाजच्या स्वार्थामुळे इतर सदस्यांना मोठा फटका बसू शकतो. शेअर केलेल्या प्रोमोवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं, "आत्ता टाकला बिग बॉसनं खरा डाव, खेळा खेळा ."दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, "सोयी सुविधा नसल्यास कॅप्टन पद काय कामाचं." आणखी एकानं लिहिलं, "कॅप्टन्सी सोडेल. शो जिंकायचा आहे त्याला, तो हुशार आहे." या प्रोमोवरुन यूजर्स निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अभिजीत सावंतमुळे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात होणार वाद - Bigg Boss Marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी छोटा पुढारी आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद! - Bigg Boss Marathi
  3. रितेश देशमुखनं 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार वैभव चव्हाणला धारेवर, प्रेक्षकांना आली महेश मांजरेकर यांची आठवण - riteish deshmukh

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.