मुंबई - Arbaaz Confirms Dabangg 4 : अरबाज खान आणि जवानचा दिग्दर्शत अॅटली यांच्यात 'दबंग'च्या चौथ्या भागाच्या निर्मितीच्या उद्देशाने भेट झाल्याची चर्चा रंगली होती. याबद्दल अरबाजने मौन सोडले आहे. 'दबंग'च्या चौथ्या भागासाठी चुलबुल हांडेला पाहण्यासाठी सलमानचे चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाबद्दल सुरू झालेल्या लेटेस्ट चर्चांमुळे सलमान आणि अरबाजने अॅटलीची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र या गोष्टीचे अरबाजने खंडन केले आहे.
एका वेबलॉईडशी बोलताना 'दबंग 2' च्या दिग्दर्शक अरबाज खानने सध्या सुरू असलेल्या चर्चेबाबत भाष्य केलं. त्याने अप्रत्यक्षपणे अॅटलीच्या भेटीचा संदर्भ दिला आणि स्पष्टीकरण दिले की, त्याने अॅटली बरोबर कधीही संधान साधले नाही. बॉक्स ऑफिसवर 'दबंग 3' ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने आगामी सिक्वेलमध्ये सलमान खानचा चुलबुलच्या भूमिकेबद्दलचा उत्साह कायम आहे.
अरबाजने अॅटली बरोबर झालेल्या भेटीबाबतच्या कयासांचे खंडन केले आणि म्हणाला, "सलमान, अॅटली आणि मी भेटलो ही केवळ अफवा आहे. मी अॅटलीला माझ्या आयुष्यात कधीही भेटलो नाही. मी त्याला कधीही पाहिले नाही, त्याला भेटलो वगैरे हे विसरून जा. जोपर्यंत याची पडताळणी होत नाही तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका."
'दबंग 4' च्या निर्मितीला दुजोरा देताना अरबाज म्हणाला की तो या चित्रपटावर काम सुरू करण्यास उत्सुक आहे आणि सलमानही. सलमान आणि अरबाज दोघेही सध्या त्यांच्या संबंधित उपक्रमांमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे हातातील कामे संपत नाही तोपर्यंत 'दबंग 4' सुरू होण्यास विलंब होत आहे. सिक्वेल दिग्दर्शित करण्यात स्वारस्य व्यक्त करत असूनही, अरबाज त्याच्या सहभागाबद्दल अनिश्चित आहे आणि म्हणाला की 'दबंग 4' चे दिग्दर्शक कोण असेल हे त्याने अद्याप ठरवलेले नाही.
'दबंग 4' व्यतिरिक्त, सलमान खानचे इतर चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ज्यामध्ये शाहरुख खानच्या बरोबर 'टायगर व्हर्सेस पठाण' आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित साजिद नाडियादवाला यांच्या चित्रपटाचा समावेश आहे. 2025 च्या ईदसाठी रिलीज होणारे, हे हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचे चित्रपट आहेत. दरम्यान, अॅटलीने "A6" नावाच्या त्याच्या आगामी दिग्दर्शनाच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा -
Crew trailer launch : 'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर खान झाली नाराज!
Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ केला शेअर
फॅशन वीक 2024च्या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या पांडे बनली शोस्टॉपर