ETV Bharat / entertainment

मलायका अरोराच्या वडिलांच्या प्रार्थनासभेत अरबाज खानसह स्टार्सनं वाहिली श्रद्धांजली - Arbaaz Khan Attends Prayer Meet - ARBAAZ KHAN ATTENDS PRAYER MEET

Malaika Arora's Father death: मलायका आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांच्या प्रार्थनासभेत करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अरबाज खान आदी स्टार्स कम मलायका-अमृताचे हितचिंतक पोहोचले. अनिल यांचं 11 सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झालं.

मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू
Malaika Arora's Father death (Celebs attend Prayer Meet of Malaika Arora's Father (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 14, 2024, 1:03 PM IST

मुंबई Malaika Arora's Father death: शुक्रवारी रात्री मलायका आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांच्या प्रार्थनासभेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी सर्व स्टार्सनं मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांमध्ये करीना कपूर खान, करिश्मा कपूर आणि अभिनेता-निर्माता अरबाज खान यांच्यासारखे स्टार्स होते. मलायकाच्या आईच्या घरी पोहोचलेले तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबामधील काही हळवे क्षण पापाराझीनं टिपले आहेत. दरम्यान मलायकाचे वडील अनिल मेहता यांचं बुधवारी निधन झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं शोक संवेदना व्यक्त केल्या होत्या.

अनिल मेहता यांना वाहिली स्टार्सनं श्रद्धांजली : ही दु:खद बातमी ऐकून अरोरा निवासस्थानी मलायकाचा पूर्वाश्रमीचा नवरा अरबाज खान सर्वात आधी पोहोचला. यानंतर सलीम खान, सलमा खान, हेलन, अलविरा, अर्पिता, सोहेल खान आणि सलमान खान हे अरोरा कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. अनिल मेहता यांच्यावर सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत आले होते. स्मशानभूमीत मलायका, तिचा मुलगा अरहान खान, तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर, करीना, सैफ अली खान, फराह खान आणि साजिद खान हे स्टार्स देखील उपस्थित होते. अरबाज पत्नी शुरा खानसह या कठीण प्रसंगात आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला धीर देण्यासाठी पोहोचला.

अनिल मेहता यांचा कसा झाला मृत्यू? : मुंबई पोलिसांनी अनिल मेहता यांच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत मलायका, तिची बहीण अमृता आणि त्यांच्या आईचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेहता यांनी फोन बंद करण्यापूर्वी आपल्या मुलींशी संवाद साधला होता. "मी आजारी आणि थकलो आहे." अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा अनिल यांचा फोन बंद लागत होता. पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं की, अनिल मेहता यांना इमारतीच्या बाल्कनीतून पडल्यानंतर फ्रॅक्चर झाले होते, पोस्टमॉर्टम अहवालात त्यांचा मृत्यू अनेक जखमांमुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. सध्या पोलीस अधिकारी मेहता यांचे डॉक्टर आणि इतर जवळच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मलायका अरोराच्या आईचा नोंदवला जबाब, चौकशी सुरू - Malaika Arora Father Suicide Case
  2. तब्बल सात वर्षांनी सलमाननं घेतली 'एक्स वहिनी' मलायकाची भेट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan met Malaika Arora
  3. मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अरबाज खान पत्नी शूराबरोबर पोहोचला, व्हिडिओ व्हायरल - Malaika Arora

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.