ETV Bharat / entertainment

इफ्तार पार्टीमधील व्हिडिओमुळे अरबाज खान आणि शशुरा खान झाले ट्रोल - arbaaz khan and shura khan - ARBAAZ KHAN AND SHURA KHAN

Arbaaz Khan And Shura Khan : अरबाज खान आणि त्याची पत्नी शशुरा खानचा इफ्तार पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून त्यांना ट्रोल करत आहेत.

Arbaaz Khan And Shura Khan
अरबाज खान आणि शूरा खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 1:59 PM IST

मुंबई - Arbaaz Khan And Shura Khan : हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध जोडपे अभिनेता अरबाज खान त्याची पत्नी शशुरा खान इफ्तार पार्टीमध्ये स्पॉट झाले. या जोडप्यानं पाहुण्यांमध्ये बसून एकत्र इफ्तार पार्टीचा आनंद लुटला. यादरम्यान दोघांमधील घट्ट प्रेम असल्याचं दिसलं. इफ्तार पार्टीमध्ये अरबाज आणि शशुरा एकमेकांची खूप काळजी घेत होते. या इफ्तार पार्टीत अनेक स्टार्स सहभागी झाले होते. इफ्तार पार्टीत रवीना टंडननं देखील हजेरी लावली होती. शशुरा खाननं या पार्टीत पिवळ्या रंगाच्या शरारा परिधान केला होता. यावर तिनं तिचे केस मोकळे सोडले होते. तसेच अरबाज खान यावेळी स्काय शर्टवर काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती.

इफ्तार पार्टीचा व्हिडिओ झाला व्हायरल : आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शशुरा आणि अरबाज जेवण करताना दिसत आहेत. याशिवाय हे जोडपे जेव्हा घरी जाण्यासाठी निघाले, त्यावेळी अनेकांनी त्यांना पापाराझींसह चाहत्यांनी घेरलं होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरबाज हा आपल्या लेडी लव्हला गर्दीतून बाहेर काढताना दिसत आहे. या इफ्तार पार्टीमध्ये रवीना टंडन पाहुणी म्हणून आली होती. जेव्हा तिला पापाराझीनं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तर, तिनं लगेच उत्तर दिलं की, ''मी इथे फक्त जेवायला आले आहे.'' रवीना टंडन अरबाज खानच्या 'पटना शुक्ला' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे ती अनेकदा अरबाजबरोबर दिसते.

अरबाज आणि शशुरा ट्रोल : आता अरबाज खान आणि शशुराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत त्यांना ट्रोल आहेत. या व्हिडिओवर एका युजरनं लिहिलं, ''वडील आपल्या मुलीची काळजी घेत आहे.'' आणखी दुसऱ्यानं लिहिलं, ''वडील आणि मुलीची जोडी हिट आहे. आणखी एकानं लिहिलं,''किती चांगला वडील आहे, आपल्या मुलीची किती काळजी घेतो.'' या जोडप्यानं 24 डिसेंबर 2023 लग्न केलं होतं. या जोडप्याच्या लग्नात संपूर्ण खान कुटुंब सहभागी झाले होते. अरबाज आणि आणि शशुराच्या वयामधील अंतर 25 वर्षाचे आहे. त्यामुळे अनेकजण अरबाजला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करतात. दरम्यान, अरबाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'दबंग 4' आणि 'गुल गुले बकावली'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday
  2. अदा शर्मानं नेसली आजीची साडी; किंमत कळल्यावर व्हाल थक्क! - Adah Sharma
  3. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माबरोबर मूव्ही डेटवर, व्हिडिओ व्हायरल - Tamannaah and vijay

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.