ETV Bharat / entertainment

माहीच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण, पत्नीनं खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा - MS DHONI SAKSHI WEDDING ANNIVERSARY - MS DHONI SAKSHI WEDDING ANNIVERSARY

MS Dhoni Sakshi Wedding Anniversary: आज 4 जुलै रोजी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं साक्षी सिंहबरोबर लग्न करून 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या विशेष प्रसंगी साक्षीनं तिच्या पतीला रोमँटिक शैलीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

MS Dhoni Sakshi Wedding Anniversary
एमएस धोनी आणि साक्षीचा लग्नाचा वाढदिवस (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 10:53 AM IST

मुंबई - MS Dhoni Sakshi Wedding Anniversary : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी सिंह आज 4 जुलै त्यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आता साक्षीनं थ्रोबॅक फोटोचा एक सुंदर कोलाज शेअर करून तिच्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "माझ्या 15व्या वर्षाची सुरुवात." सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच आता अनेकजण या जोडप्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कोलाजमधील एका फोटोमध्ये 'कॅप्टन कूल' त्याच्या पत्नीबरोबर फ्लाइटमध्ये डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो मोठ्या टोपीनं साक्षीचा चेहरा लपवताना दिसत आहे.

साक्षी धोनीनं शेअर : दुसऱ्या एका फोटोमध्ये हे जोडपे सुंदर पोझ देत आहे. याशिवाय शेवटच्या फोटोत साक्षी धोनीच्या चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहे. फोटोंच्या या कोलाजमध्ये धोनी आणि साक्षी एकत्र खूपच क्यूट दिसत आहेत. साक्षीनं शेअर केलेले हे फोटो अनेकांना आवडत आहेत. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतील कलाकारही या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी, अनन्या पांडे, राम चरणची पत्नी उपासना कामनेनी, मावरा, साउथ डायरेक्टर विघ्नेश शिवन, एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी, शिखर पहाडिया यांच्यासह अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

साक्षी सिंगची पोस्ट : पंजाब किंग्जची मालकीण-अभिनेत्री प्रीती झिंटानं या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे, "अभिनंदन आणि भविष्यासाठी खूप शुभेच्छा." युझवेंद्र चहलची पत्नी कोरिओग्राफर आणि दंतचिकित्सक धनश्रीनं या जोडप्याचे अभिनंदन केलंय. टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2010 मध्ये धोनीनं साक्षीबरोबर लग्न केलं होतं. 'कॅप्टन कूल'च्या लग्नाच्या बातमीनं संपूर्ण देशाला धक्का बसला. कारण दोघांनीही कोणालाही न सांगता त्यांचे लग्न केलं होतं. यानंतर साक्षी ही खूप चर्चेत आली होती. अनेकदा साक्षी ही सोशल मीडियावर पती आणि मुलगी झिवा धोनीबरोबर फोटो शेअर करत असते.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं हनीमूनमधील केले सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर - Sonakshi sinha and zaheer iqbal
  2. सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला 50 लाखाचा झटका, कियारा अडवाणीमुळे अभिनेत्याचा जीव धोक्यात - Sidharth Malhotra
  3. विराट कोहलीनं व्हिडिओ कॉल करून अनुष्का शर्माला हरिकेन बेरीलची दाखवली झलक - virat showed anushka hurricane

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.