ETV Bharat / entertainment

'बिग बॉस ओटीटी 3'ला होस्ट करणार अनिल कपूर, अर्जुन कपूरनं केलं अभिनंदन - Anil Kapoor - ANIL KAPOOR

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3' हा सध्या खूप चर्चेत आहे. या शोचं होस्टिंग आता सलमान खान ऐवजी अनिल कपूर करताना दिसणार आहे.

Bigg Boss OTT
बिग बॉस ओटीटी 3 (बिग बॉस ओटीटी 3 (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 12:51 PM IST

मुंबई - Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3' सीझन हा लवकरच सुरू होणार आहे. यावर्षी सलमान खान नाही तर बॉलिवूडचा हॉट अभिनेता अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहे. अनिल कपूर पहिल्यांदाच रिॲलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सलमान खानच्या अनुपस्थितीत अनिल त्याच्या होस्टिंगनं चाहत्यांना कितपत प्रभावित करू शकतो हे काही दिवसात कळेल. 'बिग बॉस ओटीटी 3' या महिन्यात प्रसारित होईल याची पुष्टी झाली आहे. शो सुरू होण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींची नावंही चर्चेत आहेत. हे सेलिब्रिटी यावर्षी 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये सामील होऊ शकतात.

'बिग बॉस ओटीटी 3' होस्टिंग करणार अनिल कपूर : मिळालेल्या माहितीनुसार अनेक टीव्ही स्टार्ससह यूट्यूबर्स शोचा एक भाग बनू शकतात. टीव्ही स्टार्सच्या यादीत शिवांगी जोशी, शफाक नाज, दलजीत कौर यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच सोशल मीडिया स्टार्सबद्दल बोलायचं झालं तर यावेळी झैन सैफी, व्हायरल वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, अदनान शेख या शोमध्ये खळबळ माजवताना दिसणार आहेत. 'बिग बॉस ओटीटी 3' हा शो जीओ सिनेमावर दिसणार आहे. याआधी हा शो करण जोहर होस्टिंग करण्याच्या चर्चा होत्या. आता 'बिग बॉस ओटीटी 3' अनिल कपूरचा 'झक्कास' अंदाज चाहत्यांना पाहिला मिळणार आहे. आता अनेक चाहते अनिल कपूरला शोसाठी शुभेच्छा देत आहेत. याशिवाय पुतण्या अर्जुन कपूर देखील त्याला पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील 2 सीझन कोणी जिंकले? : 'बिग बॉस ओटीटी 1'चे विजेतेपद अभिनेत्री दिव्या अग्रवालनं जिंकले होते. सीझन 2 चा विजेता यूट्यूबर एल्विश यादव होता. या शोमध्ये त्याला खूप पसंती मिळाली होती. आता सीझन 3 मध्ये कोण आपली छाप सोडणार ते पाहणं लक्षणीय ठरणार आहे. दरम्यान अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला. आता पुढे तो 'तख्त' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. बॉलिवूड सेलेब्स लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट्स, वाचा सविस्तर - lok sabha elections 2024
  2. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवीन मालिका 'भूमिकन्या'! - New serial Bhumikanya
  3. परीक्षेला न बसता टॉप करु इच्छिणाऱ्या 'बंटी बंडलबाज'ची झाली घोषणा! - Bunty Bundalbaaz

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.