ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' मधील 'अंगारों' गाण्याचे काऊंट डाऊन सुरू, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Pushpa 2 - PUSHPA 2

Pushpa 2 Song : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटातील दुसरं गाणं 'अंगारों' रिलीजसाठी सज्ज झालं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणं 6 भाषेमध्ये रिलीज करण्याचं ठरवलं असून सहाही भाषेत हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे.

Angaron song countdown
पुष्पा 2 द रुल (mythri official instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 3:02 PM IST

मुंबई - Pushpa 2 Song : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील दुसरं गाणं सुसेकी (हिंदीतील अंगारों) रिलीजसाठी तयार आहे. अलीकडेच 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी या गाण्याचा टीझर शेअर केला होता. आज 28 मे रोजी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अंगारों' या जोडप्याच्या गाण्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचे एक सुंदर पोस्टर देखील शेअर केलं आहे. यापूर्वी 27 मे रोजी निर्मात्यांनी भारतीय सिनेमाची पार्श्वगायिका श्रेया घोषालचं पोस्टर शेअर केलं होतं. 'अंगारों' हे गाणं 6 भाषांमध्ये रिलीज होणार असून त्याला श्रेया घोषाल तिचा आवाज देणार आहे.

कधी रिलीज होणार अंगारों गाणं?

'पुष्पा 2 द रुल' चित्रपटातील दुसरं गाणं उद्या 29 मे रोजी सकाळी 11.07 वाजता सुसेकी (तेलुगू), अंगारों (हिंदी), सुदाना (तमिळ), नोडोका (कन्नड), कंदालो (मल्याळम) आणि बंगाली भाषेत रिलीज होणार आहे. श्रेया घोषालनं हे गाणे या सहा भाषांमध्ये स्वतःच्या आवाजात गायलं आहे.

'पुष्पा २' कधी प्रदर्शित होणार?

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रतीक्षा आता संपत चालली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुन त्याच्या स्टाईलमध्ये पुष्पराजची डॅशिंग भूमिका साकारत आहे. रश्मिका मंदान्ना यामध्ये गावरान सुंदरी श्रीवल्लीची भूमिका साकारत असून फहद फासिलची दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पुष्पाला नडणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अनसूयाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

हेही वाचा -

  1. ऑस्कर विजेता रेसुल पुकुट्टी यांनी केली पायल कपाडियाविरुद्धचा खटला मागं घेण्याची मागणी - Oscar winner Resul Pukutty
  2. आला माधव पुन्हा प्रेक्षकांकडे...नाटकाचे ६३ प्रयोगच का होणार? प्रशांत दामले यांनी सांगितलं गुपित - Prashant Damle Drama
  3. हृतिक रोशन आणि महेश बाबूच्या मुलाचे ग्रॅज्युएशन पूर्ण, वाढवला आई वडिलांचा अभिमान - Hrithik Roshan and Mahesh Babu

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.