ETV Bharat / entertainment

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा क्रूझवरील व्हिडिओ व्हायरल - Anant Radhika Pre Wedding - ANANT RADHIKA PRE WEDDING

Anant-Radhika Pre Wedding: शाहरुख खान अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रणबीर कपूरबरोबर गप्पा मारताना दिसला. या कार्यक्रमात सलमान खान आणि जान्हवी कपूरही स्पॉट झाले.

Anant-Radhika Pre Wedding
अनंत आणि राधिकाचं प्री - वेडिंग (अनंत-राधिका प्री वेडिंग (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 7:38 PM IST

मुंबई - Anant Radhika Pre Wedding : सुपरस्टार शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सच्या आयपीएल विजयामुळे आनंदी आहे. अलीकडेच रोम, इटली येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये तो पत्नी गौरी खान आणि धाकटा मुलगा अबरामबरोबर दिसला. अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग फंक्शन हा क्रूझवर आहे. आता सोशल मीडियावर जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हायरल व्हिडिओत शाहरुख खान हा जॉनी डेपच्या लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय त्याच्याबरोबर बॉलिवूडचा हॅन्डसम हंक रणबीर कपूर आहे.

शाहरुख खानचा लूक : रणबीरनं या पार्टीसाठी कॅज्युअल लूक निवडला आहे. त्यानं बेज कोट, पॅन्टसह ग्रे शर्ट घातला आणि सनग्लासेस लावून आपला लूक पूर्ण केला आहे. तसेच व्हिडिओमध्ये गौरी खान देखील दिसत आहे. आता या व्हिडिओवर चाहत्यांनी शाहरुखच्या लूकवर कमेंट करत जॉनी डेपशी त्याची तुलाना केली आहे. एका चाहत्यानं या कमेंट विभागात लिहिलं, "पाइरेट्स ऑफ कॅरेबियन सीक्वल लोड होत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "शाहरुख खानचा लूक हा खूप कुल आहे नेहमीप्रमाणे चांगला दिसत आहे." आणखी एकानं लिहिलं, "शाहरुख खानचा हटके अंदाज." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

हे स्टार्सही स्पॉट झाले : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा इटलीतील क्रूझ प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. या पार्टीमधील जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियाचे देखील व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या स्टार्सशिवाय बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे देखील या कार्यक्रमात स्पॉट झाले.

वर्क फ्रंट : शाहरुख खान त्याच्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे. याच्या प्रोजेक्टचं नाव किंग आहे. या चित्रपटातून त्यांची मुलगी सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. दरम्यान, रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे. रणबीर आणि आलियानं भन्साळींबरोबर याआधी काम केलं आहे. याशिवाय रणबीर कपूर 'ॲनिमल'च्या सीक्वेलमध्ये असणार आहे.

हेही वाचा :

  1. कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाला दिल्या वाढदिवसाच्या शुुभेच्छा, केली पोस्ट शेअर - sonakshi sinha birthday
  2. रवीना टंडनवर दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचा आरोप, लोकांनी रस्त्यावर घेरलं - RAVEENA TANDON
  3. सुशांत सिंहच्या स्मृतीदिनानिमित्त बहीण श्वेता कीर्तीनं केदारनाथला दिली भेट, शेअर केले फोटो - Sushant Singh Rajput Sister Shweta

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.