ETV Bharat / entertainment

अनंत आणि राधिका कुटुंबासह पॅरिस ऑलिम्पिक गेम्स पाहण्यासाठी गेले, व्हिडिओ व्हायरल - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Anant Radhika in Paris Olympic 2024: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे पॅरिसमधील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवविवाहित जोडपं पॅरिस ऑलिम्पिक गेम्स पाहण्याचा आनंद लुटत आहे.

Anant Radhika in Paris Olympic 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनंत राधिका ((फाईल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 2:50 PM IST

मुंबई - Anant Radhika in Paris Olympic 2024: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या लग्नानंतर पॅरिसमध्ये आहेत. पॅरिसमधून नवविवाहित जोडप्याच्या भटकंतीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये हे जोडपं ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्यासाठी जाताना दिसत आहे. या भव्य कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे देखील आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत अनंत अंबानी पत्नी राधिकाबरोबर ऑलिम्पिक खेळांचा आनंद लुटताना दिसत आहेत.

लग्नानंतर पॅरिसमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट : हे जोडपं आपल्या कुटुंबातील सदस्यांसह खालच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. अनंत अंबानीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड शर्ट आणि मॅचिंग पॅन्ट असा पेहराव केला होता. याशिवाय त्याच्या पत्नीनं गडद केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावर तिनं पांढऱ्या स्नीकर्स घातले होते. तिचा हा लूक खूप आकर्षक असल्याचं काहीजण कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय मुकेश अंबानी यांनी क्लासिक निळी आणि पांढरी रंगसंगतीची शर्टसह काळी पॅन्ट परिधान केली होती. तसेच ईशा अंबानीनं पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता. हॉटेलमध्ये येताना आणि शहरात एन्जॉय करताना राधिका आणि अनंत कॅमेऱ्यात कैद झाले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत एका आलिशान कारमधून बाहेर पडताना दिसला. तर राधिकानं तिच्या बॉडीगार्डबरोबर सुंदर एन्ट्री केली. पॅरिसमध्ये आता अनेक स्टार्स ऑलिम्पिक गेम पाहहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत. याआधी तापसी पन्नू देखील भारतीय बॅडमिंटनपटू आणि पती -प्रशिक्षक मॅथियास बो यांना पाठिंबा देण्यासाठी गेली होती. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात जगभरातील नामांकित व्यक्ती आल्या होत्या. अनंत आणि राधिकाचा भव्य विवाह सोहळा 3 दिवस चालला होता.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्ब ठेवल्याची पोस्ट; मुंबई पोलिसांकडून आरोपीला गुजरातमधून अटक - Anant Radhika Wedding Bomb Threat
  2. अनंत - राधिका यांच्या विवाह सोहळ्यात साधू-संतांना दिली 'ही' खास भेटवस्तू; पाहा व्हिडिओ - Anant Radhika Wedding Gifts
  3. अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडींची नीता अंबानींनी मागितली माफी; 'हे' आहे कारण - Anant Radhika Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.