मुंबई Anant and Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा हायप्रोफाईल विवाह सोहळा शुक्रवारी रात्री वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी देश-विदेशातील हजारो प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. अनंत व राधिकाच्या नवीन प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून व जगभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
#WATCH | Cricketer KL Rahul, actors Athiya Shetty, Ahan Shetty, Suniel Shetty along with his wife Mana Shetty arrive for Anant Ambani-Radhika Merchant wedding at Jio World Convention Centre in Mumbai pic.twitter.com/CpKR4KhUGW
— ANI (@ANI) July 12, 2024
अनंत राधिका विवाहबध्द, हजारो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत झालं लग्न : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या तयारीसाठी अंबानींचं घर 'अँटिलिया' व लग्न सोहळा होणारं ठिकाण जिओ वर्ल्ड सेंटर खास सजवण्यात आलं होतं. या लग्नासाठी भारतातील व विदेशातील अनेक सेलिब्रेटी पाहुण्यांनी मुंबईत हजेरी लावली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय आर्वजून या लग्नासाठी हजर होत्या. त्यांच्यासह जेष्ठ नेते लालु प्रसाद यादव देखील लग्नासाठी हजर होते. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव देखील या लग्नाला उपस्थित होते. तसंच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहता या सोहळ्यासाठी खास सजले होते.
#WATCH | Actor Priyanka Chopra Jonas along with her husband and singer Nick Jonas arrive for Anant Ambani-Radhika Merchant wedding at Jio World Convention Centre in Mumbai pic.twitter.com/Ym9tH7Xicf
— ANI (@ANI) July 12, 2024
बॉलीवूड व जगातील अनेक कलाकार उपस्थित : या शाही लग्न सोहळ्यासाठी बॉलीवूडसह जगभरातील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. जगप्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सिना या लग्नासाठी खास भारतीय पोशाखात उपस्थित होते. तर सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबियांसोबत हजर होते. देसी गर्ल प्रियांका चोप्रा-निक जोन्स देसी लूकमध्ये उपस्थित होते. एकेकाळची धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं अनंत-राधिकाच्या लग्नासाठी हजेरी लावली. सारा अली खान, इब्राहीम अली खान, खुशी कपूर, राजकुमार राव त्याच्या पत्नीसह, रितेश देशमुख-जिनिलिया, वीर पहारिया, जॅकी श्रॉफ जान्हवी कपूर तिचा मित्र शिखर पहारिया सोबत जोडीनं हजर होती. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या या लग्नात एकटाच उपस्थित होता. यासोबतच अभिनेता शाहरुख खान, मिझान जाफरी,अभिनेत्री अनन्या पांडे, केजीएफचा कन्नड सुपरस्टार यश, अभिनेते जॅकी श्रॉफ, खुशी कपूर, अनिल कपूर, वरुण धवन, अनू मलिक, संजय दत्त, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, यांच्यासह बॉलीवुडचे अनेक सितारे या लग्नात उपस्थित होते.
हेही वाचा :