ETV Bharat / entertainment

'लग्नं इतके दिवस टिकत नाहीत', अभिषेक बच्चनसमोर निम्रत कौरचं विधान, व्हिडिओ व्हायरल - ABHISHEK BACHCHAN AND NIMRAT KAUR

Abhishek Bachchan and Nimrat Kaur :अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत असताना सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओमध्ये निम्रत कौरनं पती पत्नीच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

Aish, Abhishek Bachchan and Nimrat Kaur
निम्रत कौर, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 5:50 PM IST

मुंबई - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अलीकडेच त्यांच्या तथाकथिकत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. या वर्षी जुलैमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात हे जोडपे स्वतंत्रपणे आलं होतं, तेव्हापासून हे सर्व सुरू झाले आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही या अफवांवर मौन पाळगणं पसंत केलंय. दोघाहीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दुसरीकडे, अशीही अफवा आहे की, अभिषेक बच्चन दसवी चित्रपटातील अभिनेत्री निम्रत कौरला डेट करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये निम्रतने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

निम्रत दिलेली प्रतिक्रिया

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यावर निम्रत कौरच्या कमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2022 मधला आहे. यामध्ये निम्रत दसवी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. तिथे मुलाखतकारानं अभिषेकला विचारलं की, 'तुझ्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत, यावर अभिषेक म्हणतो, 'टचवूड', त्याचवेळी निम्रत म्हणाली की लग्न इतके दिवस टिकत नाही, यावर अभिषेक म्हणतो- 'धन्यवाद'. मग तिघेही हसतात. यानंतर निम्रत म्हणते- आता इतका रोमँटिक होऊ नकोस. सध्या अनेक अफवामध्ये ही देखील अफवा आहे की, निम्रत कौर आणि अभिषेक यांच्यात मैत्रीचं नातं वाढू लागलंय. पण दोघांनीही यावर कधीच भाष्य केलेलं नाही.

'आय वॉन्ट टू टॉक'मध्ये अभिषेक दिसणार आहे

कामाच्या आघाडीबद्दल बोलायचं झालं तर, पत्नी ऐश्वर्या रायपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे अभिषेक बच्चन त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटातील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं आहे. 'आय वॉन्ट टू टॉक'मधील अभिषेकचा फर्स्ट लूक रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. 'यामधील अभिषेक बच्चनच्या फर्स्ट लूकबद्दल बोलायचे झालं तर, तो खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.