मुंबई - Amy Jackson And Ed Westwick : 'सिंग इज ब्लिंग', आणि 'रोबोट 2' यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री एमी जॅक्सननं नुकतेच इंग्लिश अभिनेता एड विस्टविकबरोबर लग्न केलं आहे. तिनं तिच्या कुटुंबीय आणि जवळच्या मैत्र -मैत्रिणींच्या उपस्थित डेस्टिनेशन वेडिंग केलंय. आता तिच्या लग्नामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 23 ऑगस्ट रोजी या जोडप्यानं क्रूझवर एक आलिशान वेलकम पार्टीचं आयोजन केलं होतं. तसेच एमी जॅक्सननंदेखील तिच्या सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
एमी जॅक्सन अडकली लग्नबंधनात : एमी जॅक्सनची स्वागत पार्टी एका क्रूझवर होती. आता या पार्टीमधील सुंदर फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. एमी या वेलकम पार्टीसाठी पांढरा गाऊन परिधान केला होता. तर वेस्टविक तिच्या ड्रेसबरोबर जुळणार सूट परिधान केला होता. या पार्टीमधील एका व्हिडिओमध्ये एमी आणि वेस्टविक आपल्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणीबरोबर एन्जॉय करताना दिसत आहेत. पार्टीतील फोटो शेअर करताना एमीनं यावर कॅप्शन लिहिलं, "वेलकम पार्टी, आम्ही आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबासह अमाल्फी कोस्टवर एन्जॉय करत आहोत. आमच्या प्रेमकहाणीची शनिवार आणि रविवारची ही उत्तम सुरुवात होती."
एमी जॅक्सनवर अभिनंदनाचा वर्षाव : एमीनं ब्लॅक अँड व्हाईट फोटोंही शेअर केले आहेत. यात तिनं कॅप्शन लिहिलं," आमच्या लग्नाच्या सेलिब्रेशनची पहिली संध्याकाळ स्वप्नासारखी होती. एड वेस्टविकनं स्वित्झर्लंडमधील पिचू ब्रिजवर एमीला प्रपोज केलं होतं. तेव्हापासून चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहत होते. आता या जोडप्याचं लग्न झाल्यानंतर एमीनं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या फोटोच्या पोस्टवर लिहिलं, "अभिनंदन नवीन जोडप्याचं आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "खूप चांगले फोटो आहेत, मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे." याशिवाय आणखी एकानं यावर लिहिलं, "तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.