मुंबई - T20 world cup : भारतानं 17 वर्षांनंतर टी 20 विश्वचषक 2024 जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनं पराभूत करून ट्रॉफी जिंकली आहे. भारतानं दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. यावेळी महेंद्र सिंग धोनी संघाचा कॅप्टन होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण भारतीय संघाचा विजय साजरा करत आहे. या प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत.
Every Indian right now is feeling the same emotion!!!! This is how it’s done!!!! True champions!!! https://t.co/O6X2hbN1fJ
— Anil Kapoor (@AnilKapoor) June 29, 2024
INDIAAAAAAAA!!!! Come onnnnn!!!! Champions. 💪🏽🇮🇳
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) June 29, 2024
बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा : अनिल कपूरनं टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत लिहिलं, "सर्व भारतीय यावेळी आनंदाची भावना अनुभवत आहेत. असली चॅम्पियन्स." यानंतर या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त करत लिहिलं, "अश्रू वाहत आहेत...वर्ल्ड चॅम्पियन्स. जय हिंद." चॅम्पियन्स ट्रॉफीचा फोटो शेअर करताना सलमान खान पोस्टवर लिहिलं, "टीम इंडियाचे अभिनंदन!" तसेच कार्तिक आर्यन आपली खुशी व्यक्त करत लिहिलं, "टीम इंडियानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. आजचा विश्वचषक नाही, पण कायमची मनं जिंकली, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय." अभिषेक बच्चननेही पोस्ट शेअर करून या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला आहे.
T 5057 - Tears flowing down .. in unison with those that TEAM INDIA sheds ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 29, 2024
WORLD CHAMPIONS INDIA 🇮🇳
भारत माता की जय 🇮🇳
जय हिन्द जय हिन्द जय हिन्द 🇮🇳
Words can't describe the joy! Congratulations Team India, you've made history! 🎉🇮🇳
— Ajay Devgn (@ajaydevgn) June 29, 2024
This victory is etched in our hearts♥️#T20WorldCup #INDvSA2024
सेलिब्रिटींनी केला आनंद व्यक्त : एक्सवर अजय देवगणनं विजयाबद्दल अभिनंदन करताना लिहिलं, "आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही! अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही इतिहास रचला आहे. हा विजय आपल्या कानात घुमत आहे." अर्जुन रामपालनं या विजयाबद्दल लिहिलं, "उफ्फफ्फ, अखेर आम्ही फायनल जिंकली. माझ्यासाठी जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट आहे. सूर्यकुमार यादव, तो सर्वोत्तम होता. हार्दिक पांड्या कामगिरी जोरदार होती. अखेरच्या षटकात त्यानं संयम राखला. विराट कोहलीदेखील छान खेळला. रोहित शर्माचा ड्राय रन तोडणे हे माझ्यासाठी केकवरचे आइसिंग आहे. एक उत्तम खेळ आणि सर्वांनी चांगलं प्रदर्शन केलं. खूप खूप शुभेच्छा.' आता अनेकजण या विजयामुळे आनंदी आहेत.
हेही वाचा :
- 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2
- मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचित जोडप्यांसाठी आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा - Mukesh and Nita Ambani
- हनु-मॅन फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नासाठी केलं आमंत्रित, फोटो व्हायरल - Varalaxmi Sarathkumar