ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'मधील नवीन प्रोमो रिलीज, अमिताभ बच्चन साकारणार अश्वत्थामाची भूमिका - amitabh bachchan - AMITABH BACHCHAN

Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'चित्रपटामधील एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसत आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 10:00 AM IST

मुंबई - Kalki 2898 AD : नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' मधील दिग्गज बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या दमदार व्यक्तिरेखेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा होती. या चित्रपटात 'बिग बीं'ची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी' चा नवीन प्रोमो आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्या आयपीएल सामन्यादरम्यान शेअर करण्यात आला. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या टीझरमधून अमिताभ बच्चन या आगामी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. टीझर प्रोमोच्या सुरुवातीला एक लहान मुलगा बिग बींना विचारतो की, ते कधीच मरणार नाहीत हे खरे आहे काय ? नंतर यावर अमिताभ म्हणतो, 'द्वापर युगापासून दशावताराची वाट पाहत आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा.'

'कल्की 2898 एडी' व्हिडिओ प्रोमो रिलीज : 'कल्की 2898 एडी' च्या टीझर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हटक्या अंदाजात दिसत आहे. व्हिडिओ अमिताभ यांचा संपूर्ण चेहरा कापडानं झाकलेला दिसत आहे. यानंतर तोंडावरचा चिखल आणि त्याच्या डोळ्यातील चमक दाखवली गेली आहे. आता अमिताभ यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकाना हा लूक पाहून 'जवान' चित्रपटाची आठवण झाली आहे. 'कल्की 2898 एडी' व्हिडिओ प्रोमोवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "अमिताभ यांचा हा लूक खूप दमदार आहे, हा चित्रपट नक्कीच हिट होईल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "हा चित्रपट मी पहिल्या दिवशी पाहायला जाईल.' आणखी एकानं लिहिलं, "अमिताभ हा लूक शाहरुख खानच्या 'जवान'सारखा आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल : 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'कल्की 2898 एडी' हा आतापर्यंतचा सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वैजंती मुव्हीजनं केली आहे. दुसरीकडे, या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि प्रभास पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कमल हासन आणि दिशा पटानी देखील झळकणार आहेत. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 9 मे 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. "यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मधील अमिताभ बच्चनचं नवीन पोस्टर रिलीज, आज येईल मोठी अपडेट - AMITABH BACHCHAN KALKI 2898AD
  3. बिपाशा बसूला यंग लीडर्स फोरमतर्फे प्राईड ऑफ बंगाल पुरस्कारानं केलं सन्मानित, फोटो व्हायरल - Bipasha Basu

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.