ETV Bharat / entertainment

'लापता लेडीज'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चननं केलं रवि किशनचं कौतुक - amitabh bachchan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 2:26 PM IST

Amitabh Bachchan and Ravi Kishan : अमिताभ बच्चन आणि रवि किशन यांची अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शनमध्ये भेट झाली. यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन रवि किशनबरोबर बोलताना दिसत आहे.

Amitabh Bachchan and Ravi Kishan
अमिताभ बच्चन आणि (instagram)

मुंबई - Amitabh Bachchan and Ravi Kishan : मेगास्टार अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड आणि भोजपुरी स्टार रवि किशन यांची अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शनमध्ये भेट झाली. रवी किशननं 'बिग बीं'बरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि रवी किशन खुलेपणानं संवाद करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी रवि किशनच्या अभिनयाचे आणि 'लापता लेडीज' या चित्रपटातील भूमिकेसाठी कौतुक केले आहे. यावेळी रवि किशननं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेचेही कौतुक केलं.

रवि किशननं शेअर केला व्हिडिओ : रवि किशननं 14 जुलैच्या रात्री हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये 'बिग बी' आणि रवी किशन बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना रवि किशननं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी 'कल्की'मधील त्यांच्या पात्राची प्रशंसा करत होतो, शतकातील मेगास्टार श्री अमिताभ बच्चन माझ्या व्यक्तिरेखेची प्रशंसा करत होते, हे एक महान कलाकाराचं व्यक्तिमत्व दर्शवतं, म्हणूनच ते मेगास्टार आहेत, त्यांचं प्रेम आशीर्वादाच्या स्वरूपात नेहमी असू दे." दरम्यान 'लापता लेडीज' हा चित्रपट सुपरस्टार आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं निर्मित केला आहे.

'लापता लेडीज' आणि 'कल्की 2898 एडी'बद्दल : 'लापता लेडीज' या चित्रपटामध्ये रवी किशननं पोलिसाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सुरुवातीला तो प्रेक्षकांना वाईट वाटतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये प्रेक्षकांना त्याच्या कामासाठी टाळ्या वाजवायला भाग पाडले जाते. दुसरीकडे अमिताभ बच्चन स्टारर 'कल्की 2898 एडी'बद्दल बोलायचं झालं तर 27 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित, या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. 'कल्की 2898 एडी'नं बॉक्स ऑफिसवर तिसरा आठवडा पूर्ण केला आहे. हा चित्रपट 1000 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.