ETV Bharat / entertainment

'अभी तो वोटिंग शुरू हुई है', म्हणत अमिताभ बच्चननं मतदानासाठी केलं अनोख्या स्टाईलमध्ये आवाहन - LOK SABHA ELECTION 2024 - LOK SABHA ELECTION 2024

LOK SABHA ELECTION 2024 : आज देशात लोकसभा देशात निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीतला 'महानायक' अमिताभ बच्चननं लोकांना अनोख्या पद्धतीने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. व्हिडिओ पाहा...

Amitabh Bachchan appealed for voting
अमिताभ बच्चननं मतदानासाठी स्टाईलमध्ये आवाहन (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 11:05 AM IST

Updated : May 20, 2024, 12:55 PM IST

मुंबई - LOK SABHA ELECTION 2024 : 'मेगास्टार' अमिताभ बच्चननं 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदारांना बाहेर पडून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यानं सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओही शेअर केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई शहरातील लोकसभेच्या जागांचाही समावेश आहे. अमिताभ बच्चननं इंस्टाग्रामवर एक अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये 'खूबसूरत' चित्रपटातील सोनम कपूरवर चित्रित केलेल्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या लोकप्रिय गाण्याच्या रिमेकवर जंगलातील प्राणी नाचताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना बिग बीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, '20 मे हा तुमचा मुंबई/महाराष्ट्राला मतदान करण्याचा दिवस आहे. तुमचा अधिकार वापरा.'

याआधी शाहरुख खाननंही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांना बोटांना शाई लावण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांसह बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे.

महाराष्ट्रातील या जागांवर आज मतदान होत आहे

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदार संघात आज (२० मे) मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील १३ मतदारसंघांचा समावेश आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होत असून त्यापैकी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे रोजी चार टप्प्यात मतदान झाले आहे, तर पाचव्या टप्प्यातील निवडणुका आज २० मे रोजी होत आहेत.

हेही वाचा -

  1. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  2. दादरवासीयांमध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह; ज्येष्ठ नागरिकांसह फर्स्ट टाइम वोटर्सनं बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2014
  3. केकेआर विरुद्ध आरआरच्या सामन्यात पावसानं काढली विकेट, दोन्ही संघाला मिळाले एकेक गुण - RR vs KKR

Last Updated : May 20, 2024, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.