ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द रुल'च्या नॉन-थिएट्रिकल हक्कासाठी विक्रमी रक्कमेचा करार - Allu Arjun Pushpa 2

Allu Arjun Pushpa 2 : सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा: द रुल' या बहुप्रतिक्षित चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट, रिलीज होण्याआधीच, केवळ हिंदीमध्ये नॉन-थिएटर हक्कांच्या विक्रमी करारामुळे चित्रपट प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 11:09 AM IST

Allu Arjun
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द रुल' (Actor Allu Arjun (ANI))

मुंबई - Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा आगामी 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादळ निर्माण करत आहे. निर्मात्यांनी केवळ हिंदीमध्ये चित्रपटाच्या बिगर थिएटर अधिकारांमधून 250 कोटी रुपये कमावले आहेत. प्रख्यात निर्माता केई ज्ञानवेल राजा यांनी अलीकडील मुलाखतीत अल्लू अर्जुनच्या चित्रपटाविषयी काही खास प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, 'पुष्पा 2' चित्रपटाचे हिंदी नॉन-थिएटर राइट्स 260 कोटी रुपयांचे आहेत. अनेक भाषांचा समावेश असलेला हा भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा नॉन-थिएट्रिकल हक्क संपादन करार आहे.

आजकाल बहुतेक चित्रपट नफा मिळवत नसले तरी 'पुष्पा 2' चे निर्माते खूप चांगले काम करत आहेत. 'कांगुवा'च्या रिलीझच्या प्रतीक्षेत असलेले स्टुडिओ ग्रीनचे मालक केई ज्ञानवेल राजा यांनी लक्ष वेधलं की, 'पुष्पा 2' उत्तर भारतातील राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला उत्तर भारतात उदंड प्रतिसाद मिळाला होता. याव्यतिरिक्त, ज्ञानवेल राजा यांनी हेदेखील सांगितलं की, 'पुष्पा 2' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई 'KGF 2' पेक्षाही जास्त असेल.

"निर्मात्यांनी हे पैसे केवळ स्ट्रीमिंग, ऑडिओ आणि सॅटेलाइट अधिकार हिंदी आवृत्तीचे हक्क विकून कमावले आहेत. हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की 'पुष्पा: द राइज' हा हिंदीत डब झालेला चित्रपट 2021 मध्ये धूमधडाक्यात रिलीज झाला होता. निर्मात्यांनी हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनवर भर न देताही एकट्या हिंदीमध्ये 110 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

'KGF 2' च्या हिंदी आवृत्तीनं जवळपास 500 कोटी रुपये कमावले होते. आता, ज्ञानवेल राजा यांच्या मते, 'पुष्पा 2' ने उत्तर भारतातील राज्यांमध्ये किमान इतका व्यवसाय केला पाहिजे. 'पुष्पा 2' हा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, जगदीश प्रताप बंदरी आणि धनंजय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava
  2. 'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed
  3. 'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं, अल्लु अर्जुन आणि मंदान्नाच्या डान्स स्टेप्सची प्रेक्षकांना भुरळ - Pushpa 2 Angaaron Lyrical Video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.