ETV Bharat / entertainment

अ‍ॅलना पांडेच्या बेबी शॉवरमध्ये लिंगनिदान केल्याचे बिंग फुटले? नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप - Allana Pandey gender diagnosis - ALLANA PANDEY GENDER DIAGNOSIS

Allana Pandey gender diagnosis : अनन्या पांडेची चुलत बहीण अ‍ॅलना पांडेचा बेबी शॉवर कार्यक्रम तिने कथित लिंगनिदान केल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. तिने पती आयव्हर मॅकक्रे बरोबर केक कापल्यावर उपस्थित सर्वांनी मुलगा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला. तिचा व्हिडिओ पाहून ही गोष्ट नेटिझन्सच्या ध्यानात आल्यानंतर या जोडप्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

Allana Pandey
अ‍ॅलना पांडे बेबी शॉवर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 12:00 PM IST

मुंबई - Allana Pandey gender diagnosis : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि यूट्यबर अ‍ॅलना पांडे हिला आई होण्याचे वेध लागलेत. तिने आपली प्रेग्न्सन्सी जाहीर केल्यानंतर ती आणि तिचा पती आयव्हर मॅकक्रे यांचा आनंद शिगेला पोहोचलाय. गुरुवारी अ‍ॅलनाचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला. या स्टार स्टडेड समारंभाला फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अ‍ॅलना पांडे पती आयव्हर मॅकक्रे बरोबर अमेरिकेत राहाते. तिथे त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा कयास असल्यानं मनोरंजन जगतात एक नवं वादळ निर्माण झालंय. याचं बिंगही अ‍ॅलनाच्या बेबी शॉवर कार्यक्रमादरम्यान फुटलं. तिनं आपल्या या खास कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अ‍ॅलना आणि तिचा पती आयव्हर एका सजवलेल्या मोठ्या केक समोर बसलेले दिसतात. दोघेही केक कापण्यासाठी हातात ग्लास घेतात आणि केकवर ग्लास उलटा दाबून केक कापतात. केकचा आतून रंग निळा निघाल्यानंतर उपस्थित सर्वजण त्यांचे अभिनंदन करताना दिसतात. केकच्या आत असलेल्या रंगावरुन होणारे मूल 'मुलगा' की 'मुलगी' आहे हे ओळखण्याची एक पाश्चिमात्य पद्धत आहे. केकचा रंग गुलाबी निघाला तर 'मुलगी' आणि निळा निघाला तर 'मुलगा' असे याचे ठोकताळे आहेत. अ‍ॅलना पांडे आणि तिचा पती आयव्हर मॅकक्रेने केक कापल्यानंतर तो निळा निघाला याचा अर्थ त्यांना ही गोष्ट माहिती होती आणि त्यांनी गर्भलिंग निदान केल्याचेच स्पष्ट होते, असा दावा नेटीझन्सनी लावल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसतं. भारतात अशा प्रकारचे लिंगनिदान करण्यावर बंदी आहे. मात्र हे जोडपे अमेरिकेत राहात असल्यामुळे तिथे या गोष्टींना परवानगी आहे. पण हा कार्यक्रम भारतात होत असताना अशा प्रकारची गोष्ट उघड करणे ही बाब अनेकांना खटकली आहे. अनेक नेटिझन्स या प्रकारामुळे संतापले आहेत आणि आपली प्रतिक्रियाही देत आहेत.

अ‍ॅलना पांडेच्या बेबी शॉवर कार्यक्रमाला अनन्या पांडेसह गौरी खान, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोव्हर, शनाया कपूर, सलमानची आई सलमा खान आणि बहीण अलविरा यांसारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते. अभिनेता आदित्य रॉय कपूरनेही अलनाच्या बेबी शॉवरला हजेरी लावल्याने अनन्या आणि आदित्यच्या प्रेम प्रकारणाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत लग्न झालेल्या अ‍ॅलाना पांडे आणि आयव्हर मॅकक्रे यांनी जाहीर केले होते की ते आई बाबा होणार आहेत. यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्रिटींसह मावशी होणार असलेल्या अनन्यानेही त्यांचे अभिनंदन केले होते.

हेही वाचा -

  1. जान्हवी कपूरनं शिखर पहारिया, ऑरीसह अनवाणी पायानं चढल्या तिरपती बालाजीच्या पायऱ्या - Janhvi Kapoor Climbs remple Stairs
  2. ओटीटीवर सिक्वेल्सची रेलचेल, नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला - sequels on OTT
  3. श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर हॉरर कॉमेडी 'कपकपी'साठी पुन्हा एकदा एकत्र - Shreyas Reunites with Tusshar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.