मुंबई - Alia Bhatt Joy Awards : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं सौदी अरेबियातील रियाध येथे एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिला या पुरस्कार सोहळ्यात एंटरटेनमेंट मेकर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. या इव्हेंटमध्ये आलियानं निळ्या आणि सोनेरी साडीमध्ये ऑफ-शोल्डर ब्लाउज घातलं होतं. यावर तिनं तिचे केस अर्धे बांधलेले होते. तिनं पापाराझींसमोर उभं राहून स्मित हास्य देत पोझ दिली. आलियाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती खूप देखणी दिसत आहे.
-
WHAT A LEGENDRY FRAME ❤️🔥🫰
— HarminderBOI (@HarminderBOI) January 21, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Megastar #SalmanKhan and Alia bhatt With John Cena, Salma Hayek, Francis Ngannou, Tyson Fury, Gloria Gaynor, Anthony Hopkins, Martin Lawrence, Zack Snyder and Anthony Anderson at #JoyAwards pic.twitter.com/vGm9ozoNxs
">WHAT A LEGENDRY FRAME ❤️🔥🫰
— HarminderBOI (@HarminderBOI) January 21, 2024
Megastar #SalmanKhan and Alia bhatt With John Cena, Salma Hayek, Francis Ngannou, Tyson Fury, Gloria Gaynor, Anthony Hopkins, Martin Lawrence, Zack Snyder and Anthony Anderson at #JoyAwards pic.twitter.com/vGm9ozoNxsWHAT A LEGENDRY FRAME ❤️🔥🫰
— HarminderBOI (@HarminderBOI) January 21, 2024
Megastar #SalmanKhan and Alia bhatt With John Cena, Salma Hayek, Francis Ngannou, Tyson Fury, Gloria Gaynor, Anthony Hopkins, Martin Lawrence, Zack Snyder and Anthony Anderson at #JoyAwards pic.twitter.com/vGm9ozoNxs
आलिया भट्ट करण्यात आले सन्मानित : पुरस्कार मिळाल्यानंतर आलियानं कार्यक्रमात भाषण दिलं. तिनं म्हटलं, ''या देशात राहणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, जो देश सध्या आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणि सिनेमाच्या नावावर सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. असं क्वचितच घडते. अनेकदा जेथे पश्चिम आणि पूर्वेकडील असंख्य प्रतिभावान कलाकर एकाच छताखाली एकत्र येतात आणि एकमेकांचा आनंद साजरा करतात. यासाठी धन्यवाद.'' यापूर्वी देखील आलियाला राष्ट्रीय पुरस्कारनं सम्मानित करण्यात आलं होतं. हा राष्ट्रीय पुरस्कार तिला क्रिती सेनॉनसोबत शेअर करावा लागला होता. आलियाला हा अवार्ड 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटासाठी मिळला होता.
आलिया भट्टचं वर्कफ्रंट : आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसली होती. या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आमी, जया बच्चन यांसारखे इतर कलाकारही होते. हा चित्रपट तिचा सुपरहिट झाला होता. या चित्रपटासाठी आलियाचे खूप कौतुक करण्यात आले होते. आता पुढे ती 'जिगरा' या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहर आणि आलिया हे स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत वेदांग रैना दिसणार आहे.
हेही वाचा :